जिल्ह्यात लव्ह जिहाद करून एका धर्मांधाने हिंदु युवतीशी विवाह केला. ज्याच्याशी विवाह केला, त्याने त्या युवतीवर अत्याचार केले. त्याही पुढे जाऊन या धर्मांधाचे वडील, भाऊ असे सर्वांनी त्या युवतीवर अत्याचार केला. शेवटी त्या युवतीने घरी परत जाण्याचा निर्णय घेतला आणि घरी आल्यावर पोलीस ठाण्यात त्या तिघांविरोधात तक्रार प्रविष्ट केली. यानंतर न्यायालयीन प्रक्रिया चालू झाली. या वेळी काही धर्मांध अधिवक्त्यांनी त्या मुलीचे समुपदेशन करून तिचे मन परिवर्तन करण्याचे प्रयत्न केला; परंतु हा प्रयत्न आम्ही हाणून पाडला. पुढे हिंदु अधिवक्त्यांच्या सहकार्याने यातील तीनही आरोपींना ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.