‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’च्या अंतर्गत ‘अधिवक्ता अधिवेशना’चा दुसरा दिवस
हिंदू जागृतीसाठी कार्य करणे आणि धर्मरक्षण करणे, हे हिंदूंचे कर्तव्य आहे. तो अधिकारही आहे; पण लालसेमुळे म्हणा, राजकारणामुळे म्हणा अथवा अन्य काही कारणांमुळे हिंदू समाज या कर्तव्यापासून मागे हटला आहे. हिंदूंकडे शस्त्र, शास्त्र असूनही हिंदूंना भीरू (भित्रे) बनवले गेले आहे. हिंदूंच्या मनात अजूनही मुसलमानांच्या वर्चस्वाची भावना आहे. ती आता फेकून दिली पाहिजे. अतिसहनशीलता आता पुरे झाली. मी कट्टर हिंदू आहे. धर्मरक्षणाच्या कार्यासाठी निघालो आहे. व्यवसाय वगैरे नंतर.. मी प्रथम हिंदू आहे. भारत हे धर्मनिरपेक्ष नाही, तर धर्मराष्ट्र आहे आणि याच्या विरोधात जे कुणी येतील, त्यांना आम्ही शिक्षा करू, असे आता अभिमानाने म्हटले पाहिजे, असे क्षात्रवृत्तीपूर्ण आवाहन अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी केले.
अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी मांडलेली अन्य सूत्रे
१. भारतीय संविधानाने अल्पसंख्यांकांना केवळ समानाधिकार नाही, तर अनेक गोष्टी आंदण म्हणून दिल्या.
२. हा देश ईश्वराचा आहे. या देशाच्या संपत्तीवर प्रथम अधिकार हिंदूंचा आहे, हे ठणकावून सांगितले पाहिजे.
३. ‘गळ्यावर सुरी ठेवली, तरी वन्दे मातरम् म्हणणार नाही’, असे आज देशात अभिमानाने वक्तव्य केले जाते. असे वक्तव्य अन्य देशात होऊ शकते का ? आता मात्र असे शांतपणे ऐकून घेतले जाणार नाही. देशद्रोही, भले ते कोणत्याही रूपात कार्य करत असोत, या देशद्रोह्यांच्या विरोधात भारतमातेच्या रक्षणासाठी देशाचे सुपुत्र पुढे येतील.
गुलामीच्या काळात झालेल्या चुका सुधारणार कधी ?
महत्त्वाच्या मंदिरांच्या जवळ आज मशिदी उभ्या राहिल्या आहेत. काशी विश्वनाथाचे मंदिर असो, राममंदिर, कृष्णमंदिर येथून जवळच उभ्या असलेल्या मशिदी पाहून कुणाला खंत वाटत नाही का ? गुलामीच्या काळात झालेल्या चुका आता सुधारायला नकोत का ?, असा प्रश्न अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी उपस्थित केला.
सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी अधिवक्ता हरि शंकर जैन यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
धर्मरक्षणासाठी झुंजारपणे लढणारे अधिवक्ता हरि शंकर जैन यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी पुढील गुणवैशिष्ट्ये सांगितली.
१. कर्मठ, कर्मयोगी, धर्मरक्षणासाठी साम, दाम, दंड, भेद याचा अवलंब करण्यासाठी सिद्ध असलेले, निष्काम भावाने आणि तळमळीने कार्यरत असणारे, साधनारत असणारे अधिवक्ता हरि शंकर जैन हे सर्व अधिवक्त्यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे.
२. अधिवक्ता हरि शंकर जैन यांच्या ओजस्वी भाषणातून त्यांची धर्मनिष्ठा आणि तत्त्वनिष्ठा अनुभवायला आली. सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे त्यांना होणारी वेदना त्यांच्या भाषणातून जाणवत होती. आता हा अन्याय सहन करणार नाही, असे भाषणात ते म्हणाले, तरी प्रत्यक्षात गेल्या ३८ वर्षांत ते अन्यायाच्या विरोधात लढाच देत आले आहेत.
३. निष्काम भावाने ते धर्म आणि राष्ट्र रक्षणाचे कार्य करत आहेत. लखनौला आम्ही जेव्हा अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांना भेटलो, तेव्हा अधिवक्ता हरि शंकर जैन म्हणजे आमचे पेट्रन, संरक्षक आहेत. आम्ही साहाय्य मागितले आणि त्यांच्याकडून मिळाले नाही, असे झालेच नाही, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत.
४. हिंदूसंघटन, अधिवक्ता संघटन करण्यासाठी ते कृतीशील आहेत. हिंदुत्वाचे कार्य सक्षमतेने करा. मी तुमच्या पाठीशी आहे, अशी प्रेरणा ते कार्यकर्त्यांना देतात.
५. आजही ते त्यांना जाणवलेली सूत्रे, महत्त्वाचे संदर्भ लिहून घेतात आणि त्यांच्या परीने जे करता येईल, ते सर्व करतात. गटचर्चेच्या वेळी केरळमधील अधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आम्हाला साहाय्य लागेल, असे सांगितले, तेव्हा अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी तत्परतेने त्यासाठी विनाअट सिद्धता दर्शवली. भाषा, प्रांत, परिवार यांचे नाते नसूनही हिंदुत्वनिष्ठांमध्ये धर्मबंधुत्वाचे नाते निर्माण झाले आहे आणि एक कुटुंबभावना निर्माण झाली आहे, याचेच हे प्रतिक आहे.
६. त्यांनी त्यांच्या मुलावरही (सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन) धर्माचे संस्कार केले आहेत. लाभ-हानीचा विचार न करता धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणार्थ लढायचे आहे, असे ते म्हणतात. त्याच तळमळीतून आणि समर्पणभावनेने सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या प्रॅक्टिसचा विचार न करता ते अधिवेशनाला उपस्थित रहात आहेत.
७. व्यस्त दिनचर्या असूनही ते नियमित ध्यानधारणा आणि साधना करतात. आश्रमात आल्यावर ध्यान चांगले लागते, असे त्यांनी सांगितले. व्यस्त दिनचर्या असल्यामुळे साधना करायला वेळ मिळत नाही, असे म्हणणार्यांना अधिवक्ता जैन यांचे उदाहरण आदर्श आहे.