अधिवक्ता अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे दुसरे सत्र !
नांदेड येथील अधिवक्ता परिषदेचे प्रांत कार्यकारिणी सदस्य अॅड. रणजीत नायर अधिवक्ता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच्या दुस-या सत्रात बोलताना म्हणाले कि, गोवंशहत्या करून यांत्रिक पद्धतीने शेती करण्यास भारतियांना भाग पाडून त्या यंत्रांसाठी लागणारे इंधन अरब राष्ट्रांतून मागवावे लागते. त्यामुळे त्याद्वारे एकप्रकारे अरब राष्ट्रांना निधी दिला जाणार आहे. यातून भारताचे कंबरडे मोडण्याचा हा आंतरराष्ट्रीय प्रयत्न आहे, हे स्पष्टपणे दिसते. सध्या गोवंश हत्या सर्रासपणे होत असून गो-तस्कर रात्रीच्या वेळी गोमांसाची वाहतूक करत असतात. त्यासाठी त्यांना प्रशासन साहाय्य करत आहे, हेही जाणवते.