Menu Close

श्रीलंकेतील हिंदूंना आधार देण्यासाठी भारतातील हिंदूंनी पुढाकार घेणे आवश्यक !

प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून श्रीलंकेतील अधर्माचे राज्य नष्ट केले; मात्र आज श्रीलंकेतील हिंदूंवर पुन्हा संकटांचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत. श्रीलंकेतील हिंदू भारताकडून साहाय्य मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तेथील हिंदुत्वनिष्ठ संघटना श्रीलंकेतील हिंदु धर्माच्या रक्षणासाठी प्रयत्नशील आहेत; मात्र त्यांना आवश्यकता आहे नैतिक, आर्थिक आणि राजकीय पाठिंब्याची ! अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या श्रीलंकेत कार्यरत हिंदु धर्मविरांनी श्रीलंकेतील हिंदूंच्या दुःस्थितीविषयी उपस्थितांना अवगत केले.

धर्मांतराच्या कारवायांमुळे श्रीलंकेत हिंदू नामशेष होण्याच्या मार्गावर ! – श्री. कन्नेय्या दिनेश्‍वरन्, हिंदुत्वनिष्ठ, श्रीलंका

श्री. कन्नेय्या दिनेश्‍वरन्

१. श्रीलंकेत ४०० हून अधिक ख्रिस्ती मिशनरी संस्थांच्या माध्यमातून तेथील तामिळी हिंदूंचे ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर करण्यात येत आहे. तेथे हिंदू असलेले मानसिक रुग्ण, विधवा, लहान मुले, वयोवृद्ध आणि आजारी माणसे अशांना लक्ष्य केले जाते. गोड बोलून, पैसे, नोकरी, शिक्षणाचा व्यय अशी आमिषे दाखवून ते हिंदूंच्या असह्यतेचा अपलाभ घेऊन त्यांचे धर्मांतर घडवून आणतात.

२. ख्रिस्तांना त्यांच्या धर्माचे शिक्षण मिळते; पण हिंदूंना धर्माचे शिक्षण देणार्‍या शाळा तेथे नाहीत. ज्या हिंदूबहुल खेड्यांमध्ये ख्रिस्ती अल्पसंख्य आहेत, तेथे ते मोठी चर्च अथवा बुद्धविहार उभारतात आणि त्यांच्या कारवाया चालू करतात.

३. भारतीय सैन्याने वर्ष १९८८ मध्ये लिंगेश्‍वर मंदिर बांधले होते. वर्ष २०१८ मध्ये ख्रिस्त्यांनी ते मंदिर पाडले. अशी अनेक मंदिरे ख्रिस्ती आणि बौद्ध लोकांनी तोडून टाकली आहेत. त्यांनी अम्मा मंदिर उद्ध्वस्त केले. भर दीपावलीमध्ये ख्रिस्त्यांनी पाडलेले एक शिवमंदिर हिंदूंनी पुन्हा बांधले; मात्र महाशिवरात्रीच्या दिवशीच ते पुन्हा उद्ध्वस्त केले. अंजनेय स्वामी मंदिर भारतीय सैन्याने वर्ष १९८८ मध्ये बांधले होते. ती भूमी ख्रिस्त्यांची आहे, असे सांगून ख्रिस्त्यांनी त्या ठिकाणी हिंदूंना प्रतिबंध केला आहे. मंदिरे उद्ध्वस्त करण्याची ही अजून एक पद्धत आहे. अम्मा मंदिरही ख्रिस्त्यांनी कह्यात घेतले आहे. त्यांच्या अनुमतीशिवाय हिंदू पूजा करू शकत नाहीत. श्रीलंकेतील ख्रिस्ती आणि मुसलमान यांचा नेहमीच हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करण्याचा प्रयत्न असतो.

४. पूर्वी श्रीलंकेमध्ये ९० टक्के हिंदू होते. सध्या केवळ २० ते ३० टक्के हिंदू आहेत. धर्मरक्षणासाठी काही प्रयत्न केले नाहीत, तर भविष्यात हिंदु धर्मच तेथून संपून जाईल.

५. आम्ही श्रीलंकेत हिंदु धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही हिंदू आहोत. आम्हाला त्याचा गर्व आहे, अशी काही पत्रके आम्ही वाटत आहोत. भित्तीपत्रके लावत आहोत. तेथील हिंदूंना शिवलिंग आणि तुळस, भगवद्गीता यांचे वाटप करण्याचा आमचा मानस आहे. जेणे करून ख्रिस्त्यांच्या कारवायांना आळा बसेल.

श्रीलंकेतील हिंदूंना भारतीय हिंदूंच्या आधाराची अपेक्षा !

श्रीलंका येथे एखादा आश्रम असावा. तेथे गुरुजींनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) यावे आणि त्यांच्या वतीने तेथे हिंदूंना धर्मशिक्षण दिले जावे, तसेच हिंदूंमध्ये श्रद्धा निर्माण होण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी आमची अपेक्षा आहे. श्रीलंकेतील हिंदू एकटे नाहीत. भारतातील हिंदू त्यांच्यासमवेत आहेत, असा विश्‍वास आम्हाला द्यावे, अशी आमची अपेक्षा आहे.

विशेष 

श्री. कन्हैया दिनेश्‍वर यांनी तामिळी भाषेत मार्गदर्शन केले आणि पू. उमा रविचंद्रन् यांनी इंग्रजी भाषेत भाषांतर करून ते उपस्थितांना सांगितले. धर्मबंधूंशी संवाद साधण्यासाठी भाषेची अडचण येत नाही आणि अंतःकरणातील धर्मभावना इतरांपर्यंत तितक्याच प्रभावीपणे पोहोचवता आहे, आवश्यकता आहे केवळ तळमळीची, हे यातून दिसून आले.

भारतातील हिंदूंच्या पाठबळावर श्रीलंकेतील हिंदूंची मुक्तता अवलंबून ! – श्री. काशी आनंदन्, नेते, इंडो-इलम तामिळ फ्रेंडशिप, चेन्नई, तामिळनाडू

श्री. काशी आनंदन्

श्रीलंकेत तिसर्‍या शतकापर्यंत हिंदु राष्ट्र होते. तेथे हिंदु राजे राज्य करत होते. सम्राट अशोक यांनी सर्वप्रथम श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रचार केला. श्रीलंकेत पूर्वी सर्वत्र शिवमंदिरे होती. तेथे आता बौद्ध विहार उभारण्यात आली आहेत. त्यानंतर श्रीलंकेत सिंहली आणि हिंदु इलम असे दोन गट निर्माण झाले. वर्ष १५०५ मध्ये श्रीलंकेत पोर्तुगिज आले. वर्ष १८३३ मध्ये श्रीलंकेत हिंदूंसाठी केवळ एक तृतियांश जागा शिल्लक राहिली, तर दोन तृतियांश भूमी सिंहलीनी व्यापली. वर्ष १९७६ पर्यंत संपूर्ण बेट सिंहलींनी बळकावले. वर्ष १९७६ मध्ये प्रभाकरन यांनी लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलमची स्थापना केली आणि त्या माध्यमातून हिंदूंसाठी लढा उभारला. वर्ष २००९ मध्ये प्रभाकरन् पराजित झाले.

गेल्या पाच वर्षांमध्ये श्रीलंकेची संपूर्ण भूमी सिंहलींनी बळकावली आहे. सिंहली सरकारच्या काळात सैन्य कारवाई करून हिंदूंवर अत्याचार करण्यात आले. १० सहस्र हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आले. हिंदूंची १ सहस्र मंदिरे पाडण्यात आली. बौद्धांनी हिंदूंपासून फारकत घेतली आहे. श्रीलंकेत हिंदूंना बौद्धांनी आव्हान दिले आहे. श्रीलंकेतील हिंदूंना स्वातंत्र्य हवे, पुनर्वसन नको. भारताने श्रीलंकेत हिंदूंना स्वातंत्र्य देण्यासाठी प्रयत्न करावे. स्वातंत्र्य मिळाले, तरच श्रीलंकेतील हिंदूंना मुक्ती मिळणार आहे. भारतातील हिंदूंच्या पाठबळावर श्रीलंकेतील हिंदूंची मुक्तता अवलंबून आहे.

वर्ष २००९ मध्ये श्रीलंकेत दीड लाख हिंदूंचा नायनाट ! – डॉ. कार्तिकेयन्, नेते, इंडो-इलम तामिळ फ्रेंडशिप, चेन्नई, तामिळनाडू

डॉ. कार्तिकेयन्

श्रीलंकेतील बौद्ध असहिष्णुतावादी आहेत. २ सहस्र वर्षांपूर्वी श्रीलंकेत हिंदु धर्म होता. गेल्या ६० वर्षांत तेथे हिंदु धर्माचा नाश करण्यात आला. वर्ष २००९ मध्ये दीड लाख हिंदूंचा नायनाट करण्यात आला. त्यावेळी भारत गप्प बसला. श्रीलंकेमध्ये रेप कँप भरवण्यात आले. तेथे हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *