-
जलयुक्त शिवारसाठी ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी १ कोटी रुपये
-
डायलिसीस यंत्रणेसाठी ७ कोटी रुपये
मंदिर सरकारीकरण केल्याचे दुष्परिणाम ! हिंदूंच्या मंदिरांतील पैसा हिंदूंना धर्मशिक्षण देणे, मंदिरांतील सुव्यवस्था ठेवणे आदी धर्मकार्यासाठीच व्हायला हवा ! शासनाकडे मनोरंजन किंवा क्रीडा आदीवर उधळण्यासाठी पैसा असतांना या विकासकार्यासाठी शासन मंदिरांचा पैसा का हडपते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कणकवली : मुंबई येथील श्री सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी १ कोटी रुपये देण्यात आले होते. या कामांना प्रारंभ झाला आहे, तसेच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना डायलिसीस यंत्रणा बसवण्यासाठी १ कोटी ५१ लाख ८४ सहस्र रुपये अनुदान देण्यात येणार आहेत. राज्यातील शासकीय रुग्णालयांना डायलिसीस मशीन देण्यासाठी ७.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत राणे यांनी ही माहिती दिली. या वेळी ट्रस्टचे सतीश पाडावे, जिल्हा कृषी अधीक्षक शेळके, तालुका कृषी अधिकारी व्ही.आर्.राठोड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ डायलिसीस मशीनची सुविधा उपलब्ध होणार
सिंधुदुर्गातील देवगड ग्रामीण रुग्णालय, मालवण ग्रामीण रुग्णालय आणि कणकवली उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रत्येकी ४ डायलिसीस मशीन देण्यात येणार असून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयासाठी प्रत्येकी २ मशीन देण्यात येणार आहेत. प्रत्येक मशीन ६ लाख २७ सहस्र रुपयांचे असून ते बसवण्यासाठी प्रत्येकी ३ लाख २२ सहस्र रुपये खर्च येणार आहे, असे एकूण १ कोटी ५१ लाख ८४ सहस्र रुपये यासाठी खर्च केले जाणार आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात