Menu Close

सलमान खान, आमीर खान आदी कलाकार आणि दूरचित्रवाणीवर बोलणारे मुसलमान नेते हे छद्म मुसलमान – प्रा. कुसुमलता केडिया

प्रा. कुसुमलता केडिया, पूर्व सचांलक, हिंदु विद्या केंद्र, वाराणसी, उत्तरप्रदेश

रामनाथी (गोवा) – संगीत, नृत्य, नशा, चित्र, छायाचित्र, मूर्ती अशा गोष्टी इस्लाममध्ये प्रतिबंधित आहेत. इस्लाममध्ये निषिद्ध मानलेल्या गोष्टी करणार्‍यांना शरियत कायद्यानुसार कठोर शिक्षा आहेत. तरीही सलमान खान, आमीर खान आदी कलाकार चित्रपटांमध्ये काम करतात, मुसलमान राजकीय नेते दूरचित्रवाणीवर बोलतात ! छायाचित्र काढण्याला प्रतिबंध असल्याने, हे सर्व तर इस्लामचे उल्लंघनच करत आहेत. अशांना मुसलमान कसे म्हणता येईल ? हे तर छद्म मुसलमान आहेत. ते पगैंबरांच्या शिकवणीचा उपहास करत आहेत. इस्लामच्या नावाखाली स्वैराचाराचे ‘लायसन्स’ म्हणून हे छद्म मुसलमान कार्यरत आहेत. आजचे मुसलमान स्वतःला कट्टरतावादी मानत असले आणि लहानसहान गोष्टींमुळे इस्लामचा अपमान होण्याची आवई उठवत असले तरी, प्रत्यक्षात मुसलमानांमधील शरियतमध्ये गुन्ह्यांसाठी दिल्या जाणार्‍या शिक्षा मान्य असणारे आणि इस्लाममध्ये प्रतिबंधित कलेेल्या गोष्टी न करणार्‍या मुसलमानांची गणना केली, तर ते प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे देशापुढील खरे संकट हे अशा छद्म मुसलमानांचेच आहे, असे प्रतिपादन प्रा. कुसुमलता केडिया यांनी ‘अवैध कृत्यांचे प्रमाणपत्र घेतलेले छद्म मुसलमानांचे हिंदु राष्ट्रापुढे आव्हान’ या विषयावर केले. अधिवेशनाच्या प्रथमदिनी ‘संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे शासनाद्वारे होत असलेले दमन’, ‘ज्ञाती संस्था आणि संप्रदाय यांच्या माध्यमांतून धर्म अन् संस्कृती यांचे रक्षण’ आदी विषयांवर उपस्थित मान्यवरांनी हिंदुत्वनिष्ठांचे उद्बोधन केले. अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीच्या प्रथम सत्रात ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर भोपाळ (मध्यप्रदेश) येथील धर्मपाल शोध पिठाचे पूर्व संचालक प्रा. रामेश्‍वर मिश्र, आेडिशा येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर, कालेकाता येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ. शिवनारायण सेन, पुणे येथील ‘यूथ फॉर पनून काश्मीर’चे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कालै, वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील हिंदु विद्या केंद्राच्या पूर्व संचालक प्रा. कुसुमलता केडिया यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनाला देश-विदेशातील १५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. कायर्क्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. सुमीत सागवेकर यांनी केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *