युरोपमध्ये कोणतेही राष्ट्र निधर्मी नाही, तर प्रत्येक देशाचा एक स्वतंत्र धर्म आहे. युरोपमध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही नसून चर्चच्या अंकीत असलेल्या शासकांचे राज्य आहे. तेथील न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था यांवरही चर्चच्या व्यवस्थेचा प्रभाव आहे. केवळ भारत असा देश आहे की, जो धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) लोकशाही असलेला आहे. भारतात लोकशाही असून कोणीही स्वतंत्र शासक नाही. राष्ट्रपती, पंतप्रधान हे केवळ इंग्रज सोडून गेलेल्या आणि त्यांनी निर्माण कलेेल्या व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत. लोकशाहीला जनतेचे राज्य म्हटले जात असले, तरी भारतात लाकेशाहीत लोकांना केवळ मतदान करण्याचा अधिकार आहे, राज्य करण्याचा नाही.
संविधानाच्या हिंदीतील अधिकृत कागदपत्रांत ‘सेक्युलर’ म्हणजे ‘धर्मनिरपेक्ष’ असा अर्थ नसून ‘पंथनिरपेक्ष’ असा अर्थ आहे. त्यामुळे पंथनिरपेक्षता हटवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करायला हवी. त्या स्थापनेच्या हेतूने धर्मनिष्ठ हिंदूंना संघटित करून भ्रष्ट आणि अत्याचारी यांना शासन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा. रामेश्वर मिश्र यांनी केले. ते येथे सुरु असलेल्या सप्तम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’च्या दुस-या दिवशीच्या द्वितीय सत्रात बोलत होते.