Menu Close

हिंदूंच्या रक्षणाच्या आव्हानाचा सामना कसा करावा ? या उद्बोधन सत्रात मान्यवरांनी मांडलेले विचार !

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा दुसरा दिवस

हिंदूंच्या उत्कर्षासाठी मंदिरांचे व्यवस्थापन हिंदूंकडे असणे आवश्यक ! – जे. साईदीपक, कायदेविषयक सल्लागार, इंडिक कलेक्टिव ट्रस्ट, उत्तरप्रदेश

जे. साईदीपक, कायदेविषयक सल्लागार, इंडिक कलेक्टिव ट्रस्ट, उत्तरप्रदेश

मंदिरांमध्ये हिंदूंची ओळख निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळेच विदेशी शक्तींनी मंदिरांना आणि ब्राह्मणांना लक्ष्य केले आहे. जातीयवाद संपवून हिंदूंमध्ये एकजूट निर्माण करण्याचे मंदिर हे माध्यम बनले पाहिजे. दुर्दैवाने आपली मंदिरे आपण जनतेचा विश्‍वास गमावलेल्या शासनयंत्रणेकडे चालवायला दिली आहेत. हिंदु सोडून अन्य कोणत्याही धर्माची प्रार्थनास्थळे शासन चालवत नाही. मंदिरांचे व्यवस्थापन व्यवस्थित चालवले जात नसल्यामुळे हिंदूंना मंदिरातून धर्मशिक्षण मिळत नाही. मंदिरामधील निधी हिंदूंच्या हितासाठी वापरला जात नाही. यातून हिंदू आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनत आहेत. हिंदु धर्मांतरित होण्यामागचे हे एक मोठे कारण आहे. मंदिरांचे प्रशासन जर पुन्हा हिंदूंकडे आले, तर हिंदूंमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होईल. मंदिरांतील निधी हिंदूंच्याच हितासाठी वापरता येईल. हा निधी हिंदूंना पारंपरिक शस्त्रविद्या, शिक्षण आदी अनेक गोष्टी शिकवण्यासाठी वापरता येईल. आपले मठाधीपती, संत यांनी मंदिरांना स्वायत्ता देण्याची मागणी लावून धरली पाहिजे. मंदिर हे हिंदूंच्या एकतेचे केंद्र आहे. मंदिरांच्या माध्यमातून हिंदूंची एकजूट झाल्यास कोणत्याही शासनाला हिंदूंचे ऐकावेच लागेल. इस्रायलने ६० वर्षांत त्यांचा मान पून्हा मिळवला. शिखांनीही खालसाच्या स्थापनेनंतर काही वर्षांच्या कालावधीतच यश मिळवले. कुठलीही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही त्या समस्येविषयी किती गंभीर आहात, हे महत्त्वाचे आहे. आता किती दिवस हिंदू त्यांच्या समस्या प्रलंबित ठेवणार आहेत. ५ वर्षांत मंदिराच्या सरकारीकरणाची समस्या सोडवू, अशी समयमर्यादा ठेवून आपण वाटचाल केली पाहिजे, असे मत गौतम बुद्धनगर, उत्तरप्रदेश येथील इंडिक कलेक्टिव ट्रस्टचे कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता जे. साईदीपक यांनी मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात न्यायालयीन संघर्ष या विषयाला अनुसरून विचार मांडले.

रोहिंग्या मुसलमानांना देशात आश्रय देणे धोकादायक ! – श्री. अनील धीर, राष्ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच, ओडिशा

श्री. अनील धीर, राष्ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच, ओडिशा

उपद्रवकारक रोहिंग्या मुसलमानांना भारतात आणि तेही जम्मूसारख्या भागात वसवण्यामागे मोठे षड्यंत्र आहे. प्रशिक्षित आतंकवाद्यांपेक्षाही रोहिंग्या मुसलमान धोकादायक ठरू शकतात. मुळात दंगलखोर वृत्ती असलेल्या अशा लोकांनी जम्मूमधील विमानतळ, सैनिकतळ, रेल्वेस्थानके, महत्त्वाचे पूल, अशा संवेदनशील ठिकाणांच्या आजूबाजूला अवैध वस्ती केली आहे. हैद्राबाद, तसेच देशातील अनेक ठिकाणी हे रोहिंग्या मुसलमान येऊन राहिले आहेत. आपत्काळात हे रोहिंग्या देशाच्या सुरक्षेला धोकादायक ठरतील. याविषयी केंद्र आणि राज्य गुप्तचर यंत्रणांनी अनेकवेळा केंद्रशासनाला अहवाल पाठवला आहे; मात्र शासन अजूनही हातावर हात धरून बसले आहे. सर्वांत अधिक शरणार्थ्यांना शरण दिल्याचा दावा अमेरिका करत असली, तरी प्रत्यक्षात भारतात सर्वाधिक शरणार्थी रहात आहेत. असे असूनही भारताने आंतरराष्ट्रीय शरणार्थी करारावर स्वाक्षर्‍या कराव्यात, यासाठी भारतावर संयुक्त राष्ट्र संघाकडून दबाव आणला जात आहे. बांगलादेश, चीन, पाकिस्तान आदी देश रोहिंग्यांना आश्रय देत नसल्यामुळे या लोकांचा लोंढा भारतात येत आहे, असे मत ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनील धीर यांनी व्यक्त केले. श्री. धीर यांनी रोहिंग्या मुसलमानांची घुसखोरी आणि त्यावरील उपाय या विषयावर आपले विचार मांडले.

आपत्तीच्या वेळी धर्मबंधूंना साहाय्य करणे, हे आपले कर्तव्य आहे ! – श्री. मनोज खाडये, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, पश्‍चिम महाराष्ट्र

श्री. मनोज खाडये, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, पश्‍चिम महाराष्ट्र

सप्तर्षि जीवनाडीपट्टीमध्ये दिलेल्या भविष्यकथनाप्रमाणे येणार्‍या काळात ७० ते ७५ देशांत आपत्कालीन घटना घडतील. त्यामुळे अराजकाची स्थिती निर्माण होईल. अशी स्थिती भारतातही येऊ शकेल. त्या वेळी धर्मबंधुत्वाच्या नात्याने आपल्याला हिंदूंना साहाय्य करायचे आहे. त्याच्या साहाय्यासाठी धावून जाणे आपले कर्तव्य असणार आहे. आपत्ती कोणत्याही रूपात येऊ शकते. काही ठिकाणी जलप्रलय, भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते किंवा युद्ध, दंगली घडू शकतात. अशा आपत्तींचा सामना करण्यासाठी आपल्याला आतापासून सिद्धता करणे आवश्यक आहे. आपत्ती मंद स्वरूपाची असेल, तर आपल्या स्तरावर पीडितांना साहाय्य करता येईल; पण आपत्ती तीव्र स्वरूपाची असेल, तर त्यासाठी आपल्याला सरकार किंवा सैन्य यांचे साहाय्य घ्यावे लागणार आहे. यापूर्वी उत्तराखंड, नेपाळ, चेन्नई यांसारख्या ठिकाणी आपण आपत्कालीन साहाय्य केले आहे.

हिंदूंमध्ये साम, दाम, दंड आणि भेद यांनी शौर्य जागरण करणे आवश्यक ! – श्री. अरविंद जैन, प्रांतीय संस्कृती प्रमुख, भक्ती आंदोलन मंच, उत्तरप्रदेश

श्री. अरविंद जैन, प्रांतीय संस्कृती प्रमुख, भक्ती आंदोलन मंच, उत्तरप्रदेश

 

ज्या हिंदूंनी जगावर राज्य केले, ते आज संघर्षापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी बचावात्मक धोरण सोडून आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक आहे. आमचे शासनकर्ते हिंदूंच्या समस्या सांगत रहातात; पण हिंदूंनी काय करायला हवे, हे ते सांगत नाहीत. आम्हाला हिंदूंमध्ये शौर्य जागरण करणे आवश्यक आहे. शौर्य जागरण करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या दोन मार्गांनी प्रयत्न होणे आवश्यक आहे. एक म्हणजे शत्रूशी दोन हात करणे आणि दुसरा प्रयत्न म्हणजे शत्रूला कमकुवत करणे अन् स्वत: बलवान होणे. शत्रूला कमकुवत करण्यासाठी हिंदूंनी पुढील संकल्प केले पाहिजे.

१. मुसलमान कलावंतांचे चित्रपट पहाणार नाही.

२. लव्ह जिहादपासून वाचण्यासाठी कोणत्याही अराजकतत्त्वाला घरी आश्रय देणार नाही.

३. आपल्या धर्मस्थळांशिवाय अन्य धर्मस्थळांसमोर मान झुकवणार नाही.

४. आपल्या क्षेत्रातील साधू-संतांनी त्यांच्या कथा-प्रवचनांतून भगवंताच्या केवळ लीला नाही, तर त्याच्या क्षात्रयुक्त विचारांचाही प्रचार करावा, यासाठी त्यांना निवेदन करणे.

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *