सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी ‘लव्ह जिहाद, तसेच धर्म परिवर्तन यांचा प्रतिकार कसा करावा !’ या विषयावर उद्बोधन सत्र
लव्ह जिहादचे षड्यंत्र व्यापक स्तरावर पसरले आहे. त्याही पुढे जाऊन धर्मांध लॅण्ड जिहाद, हॉटेल जिहाद यांसह विविध मार्गांनी हिंदूंवर आक्रमण करत आहेत. याचसमवेत धर्मांतर ही देशापुढील गंभीर समस्या असून गरीब आणि आदिवासी लोकांचे फसवून धर्मांतर केले जात आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांचे षडयंत्र रोखण्यासाठी हिंदूंना जागृत करून संघटित कृती करण्याचा निर्धांर लव्ह जिहाद, तसेच धर्म परिवर्तन यांचा प्रतिकार कसा करावा, या सत्रात करण्यात आला. या सत्रात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या सत्रात स्वामी श्री हरिश्रद्धानंद सरस्वतीजी यांचा सन्मान हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी केला.
ख्रिस्त्यांचे धर्मांतराचे षड्यंत्र जाणून त्यासाठी हिदूंनी जागरूक रहाणे आवश्यक ! – डॉ. कौशकचंद्र मल्लिक, उपसंपादक, ‘ट्रुथ’, शास्त्रधर्म प्रचारसभा, बंगाल
मी जेव्हा प्रथम परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन घेतले, त्यानंतर मला कार्य करण्यासाठी दिशा मिळाली. हिंदु राष्ट्र येणारच आहे, यावर माझी दृढ श्रद्धा आहे. सनातन धर्माच्या प्रचाराचे कार्य मी माझ्या परिने करत आहे. ख्रिस्त्यांमध्ये ईस्टन-वेस्टर्न, तसेच कॅथॉलिक-प्रोटेस्टंट चर्चवाद आहे; मात्र या गोष्टी आपल्यासमोर येत नाहीत. ख्रिस्त्यांच्या विचारसरणीत मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. धर्मांतराचे षड्यंत्र पूर्वीपासून आहे आणि ते सध्याही चालू आहे. यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक रहायला हवे, असे मनोगत डॉ. कौशकचंद्र मल्लिक यांनी धर्मांतर रोखण्यासाठी ख्रिस्ती लोकांचे काही सत्य याविषयावर बोलतांना केले.
धर्मांधांच्या लव्ह, लॅण्ड, हॉटेल जिहादला हिंदूंनी वैचारिक स्तरावर प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता नीरज जैन, अध्यक्ष, हिंदू जागरण मंच, बडोदरा, गुजरात
हिंदूंच्या वस्तीत भाड्याने घर घ्यायचे, बाजूच्या हिंदूंशी जाणीवपूर्वक भांडण करायचे आणि हिंदूंना तेथून घर विकण्यास भाग पाडायचे, असे षड्यंत्र सध्या धर्मांधांकडून चालवले जात आहे. देशात लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, हॉटेल जिहाद चालून असून त्यास हिंदूंनी वैचारिक स्तरावर प्रत्त्युत्तर देण्याची आवश्यकता आहे. दोन मासांपूर्वीच गुजरातमध्ये भूमी अधिग्रहणाविषयी डिस्टर्ब एरिया अॅक्ट लागू करण्यात आला. यामुळे हिंदुबहुल भागात धर्मांध भूमी विकत घेऊ शकत नाहीत. संपूर्ण देशभर हा कायदा लागू करण्यात यायला हवा, असे मनोगत अधिवक्ता नीरज जैन यांनी व्यक्त केले. ते लॅन्ड जिहाद हिंदूंसाठी एक संकट : अनुभवकथन, या विषयावर बोलत होते.
तळागाळातील हिंदूंपर्यंत जाऊन त्यांना सेवा पुरवावी लागेल ! – सुश्री नीरा सिंह, अलाहाबाद, उत्तरप्रदेश
उत्तराखंडमधून रोजगार नसल्याने ३६०० गावांतील हिंदू विस्थापित झाले. धर्मांध उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर भूमी अधिग्रहित करत आहेत. ही धोक्याची सूचना असून हिंदूंनी वेळीच जागृत होण्याची आवश्यकता आहे. तळागाळातील हिंदूंपर्यंत जाऊन त्यांना सेवा पुरवावी लागेल. त्यांचे समुपदेशन करून त्यांना गावातून विस्थापित होण्यापासून आणि धर्मांतरित होण्यापासून परावृत्त करावे लागेल, असे मनोगत सुश्री नीरा सिंह यांनी व्यक्त केले. त्या पर्वतीय राज्यांत हिंदूंच्या समस्या आणि उपाय, या विषयावर बोलत होत्या.
धर्मांतरित झालेल्या हिंदूंना जागृत करण्याचे काम करणार ! – स्वामीजी श्री हरिश्रद्धानंद, संरक्षक, गोमंतक हिंदु प्रतिष्ठान, गोवा
ख्रिस्ती पैसे, तसेच अन्य आमिषे दाखवून गरीब हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. अशा प्रकारे लक्षावधी हिंदू धर्मांतरित होऊन ख्रिस्ती बनत आहेत. यांसाठी आपल्याला हिंदूंमध्ये चेतना जागृत करावी लागेल. गोव्यात मी ५ लाख लोकांना भेटण्याचा संकल्प केला आहे. धर्मांतरित झालेल्या हिंदूंना जागृत करण्याचे काम मी करणार आहे, असे मार्गदर्शन स्वामीजी श्री हरिश्रद्धानंद यांनी केले. ते गोव्यात चाललेले धर्मांतराचे तथ्य या विषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होते.
अधिवेशनस्थळी तिसर्या दिवशी लावलेले प्रदर्शन
रामनाथी येथील हिंदू अधिवेशनस्थळी गोरक्षण (गोहत्या हिंदु धर्मावर आलेले संकट !, गोहत्या रोखा !, गोपलनाला प्रोत्साहन द्या !), धर्मांतर (धर्मांतर महापाप, धर्म परिवर्तन म्हणजे राष्ट्राचे परिवर्तन, धर्मांतरण : हिंदूविरोधी षड्यंत्र), लव्ह जिहाद, हिंदु राष्ट्र, बांगलादेशी हिंदूंवर होणारे अत्याचार, सत्पात्रे दान करा !, सामाजिक दुष्प्रवृत्ती कशी रोखावी ?, आदी विषयांवर प्रदर्शन लावण्यात आले होते.