रामनाथी (गोवा) : आपल्या देशामध्ये संतांना पूर्वीपासूनच कलंकित करण्यात येत आहे; पण संतांची संस्कृती भक्कम असून ती पुढे जात आहे. संतांना कलंकित करण्यासाठी विदेशी शक्ती पैशाच्या जोरावर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून कार्य करत आहेत. एकच चुकीची गोष्ट वारंवार दाखवून खोटे हे खरे म्हणवून पसरवले जात आहे. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्याविषयीही ‘मीडिया ट्रायल’ करून त्यांना खोटे आणि दोषी ठरवले गेले. हा संतांवर झालेला अत्याचार आहे. त्यासाठी हिंदूंनी जागे होऊन संघटितपणे खांद्याला खांदा लावून पुढे जाऊया, असे आवाहन साबरमती (गुजरात) येथील पूज्यपाद संतश्री आसारामजी आश्रमाच्या धर्मप्रचारक साध्वी रेखा बहनजी यांनी केले. सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये ४ जून या दिवशी सायंकाळच्या सत्रात ‘संप्रदाय आणि हिंदु संघटना यांचे शासनाद्वारे होणारे दमन’ या विषयावर सत्र आयोजित केले होते. त्यात त्या ‘संत आणि संस्कृती यांवर होणार्या कटकारस्थानाच्या संकटाला ओळखावे’, या विषयावर मार्गदर्शन करत होत्या.
सत्राच्या प्रारंभी साध्वी रेखा बहनजी यांचा सन्मान सनातन संस्थेच्या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुनीता खेमका यांनी, रत्नागिरी येथील श्री सतनाम वारकरी संप्रदायाचे संयोजक ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांचा सन्मान समितीचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. हेमंत मणेरीकर यांनी, तर हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड यांचा सन्मान समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी केला.
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे निर्दोषत्व सिद्ध होऊ शकेल, असे प्रश्न
१. ज्या पीडितेने पोलीस तक्रार केली, ती ५ दिवसांनी का करण्यात आली ? त्या प्रथमदर्शी अहवालात अत्याचार केल्याची नोंद का करण्यात आली नाही ?
२. कल्पना स्वयंसेवी संस्थेने रात्री १२ वाजता तक्रार प्रविष्ट का केली ?
३. मुलीची वैद्यकीय पडताळणी केल्यावर मिळालेले प्रमाणपत्र ‘नॉर्मल’ आलेले होते. याविषयी गुजरातचे माजी पोलीस महासंचालक डी.जी. वंजारा आणि पोलीस उपायुक्त लांबा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. असे असतांना ते का लपवण्यात आले ? पोलीस उपायुक्त लांबा यांचे एका रात्रीत स्थानांतर (बदली) का करण्यात आले ?
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी विविध संप्रदायांनी हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली एकत्रित यावे ! – ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे
प्राचीन काळातही विविध देवतांच्या नावे संप्रदाय असायचे. आद्यशंकराचार्यांनी पंचायतन देवतांची स्थापना केली. हिंदु धर्मात विविध उपासनापद्धती आहेत; मात्र सर्वांचे ध्येय एकच आहे. देव, देश आणि धर्म या त्रिसूत्रीमध्ये धर्माचे कार्य चालते. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी विविध संप्रदायातील लोकांनी हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली एकत्रित यावे, असे आवाहन ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व संप्रदायांनी एकत्रित कार्य करण्याची आवश्यकता’ या विषयावर केले.
हिंदू अधिवेशन हा हिंदुत्वनिष्ठांसाठी महाकुंभ ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड
‘संप्रदायांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध होण्याची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन करतांना हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड म्हणाले की,
१. आपल्या साधू-संतांनी राष्ट्रकार्य केले आहे. त्यांनीच खरी राष्ट्रीय एकात्मता आणली.
२. आपल्या देशात लोकसंख्येविषयी नीती हवी.
३. आतापर्यंत देशात आम्हाला खोटा इतिहास शिकवला गेला. खरा इतिहास आमच्यापासून दूर ठेवण्यात आला.
४. सर्व संप्रदायांनी आत्मरक्षणासाठी संकल्प केला पाहिजे. याचसमवेत सर्व संप्रदायांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कटीबद्ध होणे आवश्यक आहे.
५. मठ, मंदिर येथून राष्ट्ररक्षणाचे कार्य केले पाहिजे. मठ, मंदिर आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे.
६. आता होत असलेले अखिल भारतीय हिंदू अधिवेशन अखिल विश्व हिंदू अधिवेशन होणार आहे.
७. समितीकडून प्रतिवर्षी आयोजित केले जाणारे हिंदू अधिवेशन हे हिंदुत्वनिष्ठांसाठी महाकुंभच आहे.