Menu Close

द्वेषभावनेतून अमेरिकेत गुरुद्वारात तोडफोड !

वॉशिंग्टन : द्वेषभावनेतून अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यात घडलेल्या घटनेत एका अज्ञात नग्न व्यक्तीने शिखांच्या गुरुद्वारात तोडफोड केली. ४४ वर्षीय आरोपीचे नाव जेफ्री सी पिट्टमन असे असून, स्पोकाने येथील गुरुद्वारात घुसून त्याने तोडफोड केली. पिट्टमनला गुरुवारी सकाळी नग्नावस्थेत अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुरुद्वारामधील एक कागद आणि विशेष तलवार जप्त करण्यात आली.

आम्ही सर्व धर्मांचा समान आदर करतो. त्यामुळे कोणाच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य केल्यास त्याची प्राधान्याने चौकशी करण्यात येईल, असे स्पोकानेचे शेरीफ ओझ्झी क्नेझोव्हिच यांनी एका निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेतील शीख समुदायाकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.

संदर्भ : तरुण भारत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *