Menu Close

साधनेविना विकास म्हणजे विनाश ! – स्वामी संवित सोमगिरिजी महाराज, महंत, श्री लालेश्‍वर महादेव मंदिर, बिकानेर, राजस्थान

स्वामी संवित सोमगिरिजी महाराज, महंत, श्री लालेश्‍वर महादेव मंदिर, बिकानेर, राजस्थान

आपले हृदय हे मूलतः प्रेम आणि सद्भावना यांचा सागर आहे; पण ईश्‍वरविषयक संकल्पना, आध्यात्मिक दृष्टी नसल्याने बहुतांश जण ते अनुभवू शकत नाहीत. ईश्‍वरविषयक आपल्या संकल्पना सुस्पष्ट असायला हव्यात, तरच धर्मकार्य करणे सुलभ जाते. आपण विकासाच्या विरोधात नाही; पण साधनेविना विकास करणे म्हणजे विनाशाकडे वाटचाल करण्यासारखे आहे, असे मार्गदर्शन करतांना बिकानेर, राजस्थान येथील श्री लालेश्‍वर महादेव मंदिराचे महंत स्वामी संवित सोमगिरिजी महाराज यांनी केले.

या वेळी स्वामी संवित सोमगिरिजी महाराज म्हणाले…

१. आपण भगवद्गीतेला केवळ पूजेपुरते मर्यादित ठेवले आहे. गीतेचे आचरण आपण करत नाही. त्यामुळे सगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

२. लिव्ह-इन-रिलेशनशीपविषयी निर्णय देतांना न्यायाधीश पवित्र अशा राधा-कृष्ण यांच्या संबंधाचे उदाहरण देतात आणि संपूर्ण हिंदु समाज शांत रहातो. हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्याचे हे लक्षण आहे.

३. घराघरांत हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना देशात ते स्थापन होणार नाही. प्रत्येकामध्ये महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रकट व्हायला हवेत.

स्वामी संवित सोमगिरिजी महाराज यांनी सनातन संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार

सनातनच्या पाठीशी असलेल्या गुरुपरंपरेला शरण जाऊन कार्य केले पाहिजे !

१. हिंदु राष्ट्राचा विषय सर्वत्र प्रज्वलित केल्याविषयी मी सनातनच्या साधकांचे विशेष अभिनंदन करतो. सनातनच्या साधकांनी गृहस्थाश्रमात राहून संतपद प्राप्त केले. हे सनातनचे वैशिष्ट्य आहे.

२. साध्य, साधनसामुग्री, सिद्धांत यांविषयीच्या संकल्पना सुस्पष्ट करण्यासाठी सिद्ध पुरुषाची म्हणजे गुरुंची आवश्यकता असते. त्यासाठी शास्त्र, गुरु, आत्मा यांना शरण जावे लागते. गुरुला एक व्यक्ती म्हणून पहाणे हे शास्त्रविरोधी आहे. सनातनकडे गुरुपरंपरा आहे. महान गुरु तुमच्याकडे आहेत. प.पू. भक्तराज महाराज यांच्यामागे गुरुपरंपरा आहे. गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाही, तर गुरु काळस्वरूप असतात. अशा गुरुपरंपरेला शरण जाऊन आपण कार्य केले पाहिजे.

३. सनातनचे सर्व साधक मला निरंतर मुरली वाजवतांना दिसत आहेत.

४. प्रतिकूल वातावरणात एक नवी ज्योत घेऊन सनातन संस्था भारतभरात निघाली आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून नवी उर्जा आणि शक्ती घेऊन पुढे जात आहे.

५. या हिंदु राष्ट्राच्या यज्ञकुंडात अर्पित होण्याची इच्छा पूर्ण विश्‍वात पसरावी, अशी प्रार्थना !

अधिवेशनात सहभागी झालेल्यांच्या अंतरी दिव्य शक्ती, बाहेर साहस अन् वीरता यांचा प्रत्यय !

हिंदू अधिवेशनात निर्माण झालेले हिंदु राष्ट्राचे तरंग आता जगभर पसरत आहेत. येथे उपस्थित असलेल्या धर्मविरांच्या हातात आता अर्जुनाचे गांडीव धनुष्य आले आहे. आपल्या आत मधुरता आणि एक दिव्य शक्ती कार्यरत असून बाहेर साहस अन् वीरता यांचा प्रत्यय येत आहे. आपण पांचजन्यचा घोष केला असून जगातील कोणतीही शक्ती हिंदु राष्ट्र स्थापनेपासून रोखू शकत नाही.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *