एका ऐतिहासिक उद्यानातील अतिक्रमण थांबण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना प्रशासनाला निवेदन का द्यावे लागते ? तेथे मशीद बांधण्याची ते वाट पहात आहेत का ?
प्रयाग (उत्तरप्रदेश) : येथील चंद्रशेखर आझाद उद्यान ज्याला ‘कंपनी बाग’ नावानेही ओळखले जाते, या उद्यानात कोणतीही मशीद नसतांना रमझान मासात मुसलमानांकडून तरबी वाचण्यात येते. या माध्यमातून धर्मांधांचा उद्यानाची जागा अवैधपणे कह्यात घेण्याचा डाव दिसून येतो. त्यामुळे शासनाने यात तात्काळ लक्ष घालून त्वरीत कार्यवाही करावी, अशी मागणी धर्माभिमानी अधिवक्ता अवधेश राय यांच्या नेतृत्वाखाली धर्माभिमानी अधिवक्त्यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देऊन केली. या उद्यानाच्या मुख्य दारातून जाताच आतमध्ये एका जीर्ण वास्तूला मजारीचे स्वरूप देण्यात आले, तसेच आजूबाजूची झाडे तोडून त्या भूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या भूमीवर नियमितपणे सहस्रोंच्या संख्येत धर्मांध नमाजपठण करतात आणि तरबी वाचतात. हे उद्यान बंद करण्याची वेळ रात्री १० वाजताची असूनही धर्मांध या ठिकाणी रात्रीचे २-३ वाजेपर्यंत फिरत असतात, असेही या निवेदनात म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात