Menu Close

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे केरळमधील जन्महिंदूंची झालेली दयनीय स्थिती !

कु. प्रणिता सुखठणकर, केरळ

१. ‘पैसा मिळवणे, हाच जीवनाचा उद्देश आहे’, असा समज असणे

‘केरळ येथील जन्महिंदू उच्चशिक्षित आहेत. हे उच्चशिक्षित लोक विदेशात जाऊन नोकरी करतात किंवा भारतातच मोठ्या पदावर नोकरी करून पैसे मिळवतात.

२. हिंदू वैयक्तिक आयुष्यात सुखी नसणे

केरळमध्ये वैयक्तिक आयुष्यात सुखी असणार्‍या हिंदूंचे प्रमाण पुष्कळ अल्प आहे. येथील प्रत्येक घरात काही तरी मोठे दुःख असतेच, उदा. पती-पत्नीचे पटत नाही, मुले पालकांचे ऐकत नाहीत किंवा त्यांच्यात भांडणे होतात, काही कुटुंबांमधील सदस्य व्यसनाला बळी पडलेले असतात. या आणि अशा अनेक समस्या येथे आहेत. केरळमधील पुष्कळ लोकांना कर्ज घेण्याची सवय असते; मात्र ते कर्ज फेडतांना त्यांना पुष्कळ त्रास होतो. कर्जाच्या माध्यमातून हे लोक स्वतःवर आर्थिक अडचणी ओढवून घेतात.

३. हिंदु धर्माविषयी अधिक माहिती नसूनही कर्मकांडावर पुष्कळ विश्‍वास असणारे केरळमधील हिंदू !

३ अ. प्रतिदिन सकाळी देवळात जाणे, दिवा लावणे आणि धन अर्पण करणे यांसारख्या कृतींना पुष्कळ महत्त्व देणे : केरळमधील हिंदूंना धर्माविषयी अत्यल्प माहिती आहे; पण तरीही ‘त्यांचा कर्मकांडावर पुष्कळ विश्‍वास आहे’, हे महत्त्वाचे आहे. त्यांना प्रतिदिन सकाळी किंवा आठवड्यातून एकदा तरी देवळात जाणे महत्त्वाचे वाटते. ‘देवळातील हुंडीत धन अर्पण केले, तर आपले सर्व चांगले होणार’, असा येथील अनेक लोकांचा विश्‍वास आहे. वेगवेगळ्या देवतांच्या देवळात जाऊन दिवा लावणे, अर्चना करणे इत्यादी कृती हे लोक करतात.

३ आ. अन्नदानासाठी मोठ्या रकमेची देणगी देणे : येथील लोक अन्नदानाला महत्त्व देतात आणि त्यासाठी कितीही रकमेची देणगी देण्याची त्यांची सिद्धता असते; कारण ‘अन्नदान केल्याने पुष्कळ पुण्य मिळते’, असा त्यांचा विचार असतो. प्रत्यक्षात अन्नदानाच्या नावाखाली कितीतरी अन्न वाया जाते आणि त्या अन्नाचा अपमान होत असतो.

३ इ. धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे : येथील लोक ‘ललितासहस्रनाम’ आणि ‘विष्णुसहस्रनाम’ यांच्या वाचनालाही पुष्कळ महत्त्व देतात. ‘श्रीमद्भागवत ऐकल्यास त्याचा पुष्कळ लाभ होतो’, असा येथील लोकांचा विश्‍वास आहे. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी भागवत सप्ताहाचे आयोजन केलेले असते. या सप्ताहाच्या ठिकाणी दिवसा वयस्कर लोक असतात. दुपारच्या वेळी बाहेरून अनेक लोक जेवण करण्यासाठी या ठिकाणी येतात. जेवणानंतर मात्र तेथे अत्यल्प उपस्थिती असते.

४. उत्सवाच्या वेळी अधिकाधिक हत्तींना मंदिरात आणून उत्सवाला स्पर्धेचे स्वरूप देणारे आणि याच हत्तींच्या माध्यमातून उत्सवाचा होणारा विध्वंस शांतपणे पहाणारे जन्महिंदू !

उत्सवाच्या दिवशी येथील मंदिरांमध्ये हत्ती उभे करण्याला पुष्कळ महत्त्व आहे. येथे मंदिरात अधिकाधिक हत्ती उभे करण्याची स्पर्धा असते, उदा. एका मंदिरात ३ हत्ती उभे केले, तर दुसर्‍या मंदिरात ५ हत्ती उभे करतात. या हत्तींची ‘रामचंद्रन्’, ‘भाग्यलक्ष्मी’, अशी नावे असतात. ‘कोणत्या हत्तीला मंदिरात आणले ?’, यालाही येथे महत्त्व असते. या हत्तींचे मालक इतर पंथीय असतात. हिंदू लाखो रुपयेे भाडे देऊन या हत्तींना उत्सवासाठी मंदिरात आणतात. येथील उष्णता आणि शारीरिक थकवा यांमुळे हत्ती थकतात अन् योग्य प्रतिसाद देत नाहीत. तेव्हा हे लोक त्यांच्यावर अत्याचार करतात. त्यामुळे हत्ती रागाने उत्सवाचा विध्वंस करून तोडफोड करतात. यात माहूत मारले जातात, तरीही हिंदू जागे होत नाहीत.

५. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे निद्रिस्त असलेले हिंदू !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे येथील हिंदूंंच्या मनात ‘सर्व धर्म एक आहेत’, असा प्रबळ विचार असतो. वैयक्तिक, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर हिंदूंची स्थिती चांगली नाही. ‘लव्ह जिहाद’सारखी प्रकरणे स्वतःच्या घराजवळ आली आहेत, तरीही येथील हिंदू निद्रिस्त आहेत.

येथील हिंदूंना ‘लव्ह जिहाद’विषयी काही सांगितल्यास ‘लव्ह जिहादचे संकट आमच्या घरी नाही’, ‘मला मुलगा आहे’, ‘माझ्या मुलींचे लग्न झालेलेे आहे’, ‘आम्ही आमच्याच धर्माला महत्त्व देतो; त्यामुळे तुम्ही आम्हाला हे सांगू नका’, असे ते म्हणतात. असे हिंदू कधी जागे होणार ?

जेव्हा स्वतःचा मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांमध्ये असतांना पक्षाच्या नावाखाली बळी पडेल, मुलगी लव्ह जिहादला बळी पडेल आणि आय.एस्.आय.एस्.चे सदस्य केरळमध्ये धुमाकूळ माजवतील, तेव्हा या हिंदूंना जाग येईल.

६. इतर पंथियांच्या प्रभावामुळे हिंदूंना स्वधर्माचा विसर पडणे

इतर पंथियांनी हिंदूंच्या मनावर त्यांच्या पंथांचा एवढा प्रभाव टाकला आहे की, आज अनेक हिंदू चर्चमध्ये जातात. आपल्या मुलीने किंवा मुलाने इतर पंथीय मुलाच्या समवेत किंवा मुलीच्या समवेत विवाह केला, तरी त्यांना चालते. सौदी अरेबियासारख्या देशात अर्थार्जन करण्यासाठी गेल्यावर विवाहित महिलेने बुरखा घातला, तरी त्यांना चालतो. इतर पंथियांच्या सणांच्या वेळी त्या पंथाच्या लोकांकडून चालवण्यात येणार्‍या शाळांमध्ये दुपारी जेवणाची सुटी देत नाहीत. त्या वेळी हिंदूंंची मुले उपाशी रहातात आणि निमूटपणे हे सर्व सहन करतात.

हिंदूंनो, आता तरी जागे व्हा. जाती आणि संघटना सोडून हिंदु धर्माच्या नावाखाली एकत्र या, तर आणि तरच देव आपल्याला वाचवेल.’

– कु. प्रणिता सुखठणकर, केरळ (२.३.२०१८)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *