असे एकतरी हिंदु लोकप्रतिनिधी का म्हणत नाही ?
भाग्यनगर : रमझान मासामध्ये इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन करणारे राजकीय नेते मतांसाठी लाचार झाले आहेत, असे विधान भाग्यनगर येथील भाजप आमदार टी. राजासिंह यांनी केले आहे. ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे त्यांनी हे विधान केले आहे.
आमदार टी. राजासिंह यांनी ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे मांडलेले विचार
१. सध्या मुसलमानांचा पवित्र रमझानचा महिना चालू असल्याने तेलंगणमधील अनेक आमदार इफ्तारच्या मेजवान्यांच्या आयोजनात व्यस्त आहेत. या मेजवान्यांच्या वेळी ते गोल टोपी घालून ‘सेल्फी’ (स्वत:सह इतरांचे छायाचित्र) काढतांना दिसत आहेत. माझे विचार यांपेक्षा भिन्न आहेत. त्यामुळे मी अशा मेजवान्यांना पाठिंबा देत नाही.
२. अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना, अयोध्येत राममंदिराची उभारणी, देशात गोहत्याबंदी, तसेच विस्थापित काश्मिरी पंडिताचे पुनर्वसन, हे माझे ध्येय आहे.
३. जगात ५० हून अधिक इस्लामी राष्ट्र आणि १०० हून अधिक ख्रिस्ती राष्ट्र आहेत, तर १०० कोटी हिंदू असलेला भारत ‘हिंदु राष्ट्र’ का होऊ शकत नाही ?
४. तेलंगणचेे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना राज्यातील आर्थिक संकटासाठी पैसा नको, तर अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठी पैसा हवा आहे. तेलंगण सरकार इफ्तार मेजवान्यांसाठी ६६ कोटी रुपये व्यय करत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments