- पाकिस्तानची फूस असल्यामुळे पंजाबमधील काही शीख स्वतंत्र खलिस्तानची मागणी करण्यासाठी आतंकवादी कारवाया करतात; मात्र पाकिस्तानमध्ये त्यांच्या शीख बांधवांची झालेल्या स्थिती पाहून ते सुधारतील, अशी अपेक्षा !
- भारतात अल्पसंख्यांकांवर चुकूनही आक्रमण झाले, तर छाती पिटणारे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी हे पाकमधील अल्पसंख्यांक हिंदू, शीख यांच्या नरसंहारावर मात्र मौन बाळगतात !
पेशावर (पाकिस्तान) : येथील शीख धर्मियांवर सातत्याने इस्लामी कट्टरतावाद्यांकडून आक्रमणे होऊ लागल्याने ३० सहस्र शिखांपैकी ६० टक्के शिखांनी (१८ सहस्र शिखांनी) अन्य देशांत पलायन केले आहे. काही जण भारतात शरणार्थी म्हणून रहात आहेत. काही दिवसांपूर्वीच येथील शिखांचे धर्मगुरु आणि मानवाधिकार कार्यकर्ते चरणजीत सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. येथील बाबा गुरपाल सिंह यांनी म्हटले की, मला वाटते की, येथे शिखांचा नरसंहार होत आहे.
१. वर्ष २०१६ मध्ये पाकच्या ‘तहरीक-ए-इन्साफ पार्टी’ या पक्षाचे खासदार सोरन सिंह यांची ते शीख असल्याने हत्या करण्यात आली होती. या हत्येचे दायित्व तालिबानने घेतले होते; मात्र तरीही पोलिसांनी सिंह यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि अल्पसंख्यांक हिंदूंचे नेते बलदेव कुमार यांना अटक केली. नंतर त्यांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली.
२. पाकिस्तान सिख कौन्सिलचे एक सदस्य बलबीर सिंह यांनी सांगितले की, येथील शिखांचा नरसंहार केला जात आहे; कारण ते येथील लोकांपेक्षा वेगळे दिसतात. काही शिखांनी आरोप केला की, तालिबानी त्यांचा नरसंहार करत आहेत.
३. आता शिखांना त्यांची ओळख लपवण्यासाठी केस कापावे लागत आहेत. पगडी घालणे बंद करावे लागत आहे. येथे शिखांसाठी स्मशानही नाही. येथील सरकारने त्यासाठी आर्थिक तरतूद केली असली, तरी त्याची निर्मिती करण्यात आलेली नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात