‘क्वांटिको’ मालिकेवरून अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांना विरोध करण्याचा प्रयत्न
भारतात कधी हिंदु धर्माच्या विरोधात विधान केल्यामुळे कोणाला नोकरीवरून काढले जाते का ?
दुबई : अमेरिकेतील दूरचित्रवाहिनीवरील मालिका ‘क्वांटिको’मध्ये हिंदूंना आतंकवादी दाखवण्यात आले होते. या मालिकेत भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी अभिनय केला होता. याचा विरोध झाल्यावर मालिकेचे निर्माते आणि प्रियांका चोप्रा यांनी क्षमायाचना केली होती. याच प्रकरणी दुबईतील ‘जे.डब्ल्यू. मॅरिएट मार्किस हॉटेल’च्या ‘रंग महल रेस्तराँ’चे शेफ अतुल कोचर यांनी ‘ट्वीट’ करत प्रियांका चोप्रा यांच्यावर टीका केली होती. या वेळी कोचर यांनी इस्लामचाही विरोध केला होता. त्या टीकेचा विरोध झाल्यावर त्यांनी क्षमा मागितली होती, तरीही त्यांना हॉटेल व्यवस्थापनाने नोकरीवरून काढले आहे.
कोचर यांनी प्रियांका चोप्रा यांना उद्देशून लिहिले होते की, गेल्या २ सहस्र वर्षांपासून इस्लामच्या दहशतीच्या सावटाखाली रहाणार्या हिंदूंच्या भावनांचा तू सन्मान केला नाहीस. तुला लाज वाटली पाहिजे. (कोचर यांनी जे लिहिले, त्यात खोटे काय आहे ? कोचर यांनी सत्य लिहिल्यामुळेच ते इस्लामी कट्टरतावाद्यांच्या पचनी पडलेले नाही. त्यातूनच त्यांना विरोध झाला. दुबईसारख्या इस्लामी देशांतील शहरात अन्य धर्मियांना कट्टरतावाद्यांच्या सावटाखाली रहावे लागते, हे कोणीही नाकारू शकत नाही. तेथे हिंदूंना त्यांच्या धार्मिक कृती करण्यावर बंदी आहे, यावर कोणीच कधी टीका करत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात