Menu Close

परावलंबित्व सोडून स्वत्व धारण करायचे असेल, तर शिवतेज प्राशन केल्याशिवाय पर्याय नाही : पू. भिडेगुरुजी

ठाणे : हिंदुस्थानवर ८५० वर्षे मुसलमानांचे राज्य होते २५० वर्षे ख्रिस्त्यांचेे राज्य होते. अशा वातावरणामुळे हिंदूंमध्ये गुलामगिरीची विषवल्ली निर्माण झाली आणि आजगायत ती जायचे काही नाव नाही. हे परावलंबित्व सोडून स्वत्व धारण करायचे असेल, तर शिवतेज आणि शंभुतेज प्राशन केल्याशिवाय पर्याय नाही, असे परखड उद्गार पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी ठाणे येथील बैठकीत काढले. नौपाडा येथील शुभंकरोती हॉल येथे सुवर्ण सिंहासनाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

त्यांनी या वेळी पुढील सूत्रे मांडली –

१. पृथ्वीराज चव्हाणने १३ वेळा घौरीला हरवून नंतर क्षमा करून जिवंत सोडले; पण १४ व्या वेळेस गद्दार हिंदु जयचंदने घौरीस जिंकवले. डोळ्यांदेखत नखशिखान्त साखळदंडात बांधलेल्या पृथ्वीराजच्या बायकोवर बलात्कार झाला; आणि आपण म्हणतो सर्व धर्म सारखे, सर्वधर्मसमभाव !

२. १८ खान शिवरायांवर चालून आले; पण ते त्यांनी संपवले. २८९ लढाया लढले. त्यातील २०० लढाया केवळ नि केवळ स्वकियांशी लढाव्या लागल्या, हे हिंदूंचे दुर्दैव. ‘एकी न्हवे बेकीच’ !

३. शिवराय नीट समजून घ्यायचे असतील, तर पहिले संपूर्ण महाभारत वाचावे लागेल.

क्षणचित्रे

१. कार्यक्रमस्थळी २०० ते ३०० पोलिसांचा ताफा संरक्षणासाठी होता. बॅगा तपासूनच सभागृहात प्रवेश मिळत होता.

२. एक पत्रकार पू. गुरुजींचे छायाचित्र काढण्यास पुढे येत असता त्यास ‘आपण कृपया मागे जावे, आम्हास प्रसिद्धि नको, कार्यात बाधा येते’, असे त्यांनी सांगितले. (कुठे प्रसिद्धीला हपापलेले नेते आणि कुठे प्रसिद्धीपराङ्मुख पू. भिडेगुरुजी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. कार्यक्रम स्थळी एका प्रसिद्ध वत्तवाहिनीच्या चमूमध्ये एक युवा महिला पत्रकार इतर पुरुष सहकार्‍यांशी चेष्टा मस्करी करत होती. इतर धारकरी शिस्तित शांत बसलेले असतांना ही महिला सहकार्‍यांना ‘यु गवार पिपल आय एम स्टडिड फ्रॉम कॉनव्हेंट नॉट लाईक यू’ असे म्हणत खिजवत होती. (कॉन्व्हेंटमधून बाहेर पडणारी हिंदु मुले कशा प्रकारे ‘ख्रिस्ती’ झालेली असतात, हेच यातून लक्षात येते ! कॉन्व्हेंट शाळेतील मुलांना नैतिकतेचे धडे दिले जात नाहीत, हेच यातून लक्षात येते. अशा पत्रकारांना भारतीय संस्कृती आणि राष्ट्रभक्ती यांचे महत्त्व काय कळणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) येथे आलेल्या पत्रकारांना तेथील शिस्तीचा शांततेचा मागमुस ही नव्हता.

४. शेवटी या वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी बाहेर उभे असतांना गाडीत बसतांना पू. गुरुजींना ‘आपल्या वाक्याचा विपर्यास केला जातोय का ?’ असे पत्रकारांनी विचारले. त्यावर गुरुजींनी कोणालाही प्रतिसाद दिला नाही. (पू. गुरुजींचे संभाषण मोडून तोडून दाखवणार्‍या माध्यमांना असा प्रश्‍न विचारायचा अधिकार तरी आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *