इस्लामी देशात जिहादी आतंकवाद्यांना फाशी ठोठावली जाते, तर भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात त्यांना वर्षानुवर्षे पोसले जाते !
नवी देहली : इजिप्तच्या न्यायालयाने बंदी घातलेल्या ‘मुस्लिम ब्रदरहुड’ संघटनेच्या ११ जणांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. वर्ष २००३ मध्ये पोलिसांच्या वाहनावर आक्रमण करून पोलिसांची हत्या केल्याच्या आरोपप्रकरणी त्यांना दोषी ठरवून ही शिक्षा देण्यात आली आहे. न्यायालयाने मुस्लिम ब्रदरहुडच्या अन्य ५ जणांना २५ वर्षांची जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. इजिप्तचे माजी राष्ट्रपती महंमद मुर्सी यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात