नवी दिल्ली : भारताच्या तीव्र विरोधानंतरही अमेरिका सरकाने पाकिस्तानला आण्विक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेले आठ एफ – १६ लढाऊ विमान विकायला मंजुरी दिली. अमेरिकेतील प्रसार माध्यमांचा वृत्तानुसार, अमेरिकन सरकारने या बाबत शनिवारी रात्री औचारिक घोषणा केली.
७०० दशलक्ष डॉलर्स किमतीचा व्यवहार
- दक्षिण आशियामधला पाकिस्तान हा अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार असून त्याची सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या विक्रीमुळे या प्रांतातील लष्करी संतुलन ढळणार नाही अशी पृष्टीही अमेरिकेने जोडली आहे.
- ओबामा प्रशासनाचा पाकिस्तानसोबतचा हा व्यवहार ७०० दशलक्ष डॉलर्स किमतीची राहणार आहे.
निर्णयावर भारताने नाराजी व्यक्त केली
- अमेरिकेच्या भारतातील राजदूताला बोलावून ही नाराजी त्यांच्याकडे व्यक्त केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
- पाकिस्तानला ही विमाने, त्यासाठी लागणारी अन्य उपकरणे, प्रशिक्षण आणि दळणवळण यंत्रणा या बाबी पुरवण्यात येणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
- पेंटागॉनच्या संबंधित विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला असून हा निर्णय अमेरिकेच्या पराराष्ट्र धोरणाला अनुसरून असल्याचे म्हटले आहे.
- या विमानांमुळे पाकिस्तानच्या हवाई दलाची क्षमता वाढेल आणि देशातील दहशतवादाला आळा घालण्यास मदत होईल, असा दावाही पेंटागॉन ने केला आहे.
- कोणत्याही हवामानात शत्रुवर हल्ला करण्याची क्षमता या लढाऊ विमानात आहे.
- अमेरिकेतील सत्ताधारी व विरोधकांमधील काही प्रभावशाली खासदारांनी पाकशी हा करार करू नये यासाठी विरोध दर्शवला होता. दरम्यान, भारताने या व्यवहारास विरोध केला आहे असून आपली नाराजी अमेरिकेला कळवली आहे.
संदर्भ : दिव्य मराठी