Menu Close

छत्तीसगडमध्ये युवतीचे धर्मपरिवर्तन करून धर्मांधाचा विवाह !

पोलिसांनी धर्मांधांना साथ दिल्याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा आरोप

गृहमंत्री राजनाथ सिंह यांना आतातरी ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय, ते लक्षात येईल का ?

रायपूर (छत्तीसगड) : गिर्रा येथील एक युवती खुर्सीपार येथे तिच्या मामाच्या घरी शिक्षण घेत असतांना अल्ताफ खान याने तिला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एप्रिलमध्ये ती युवती खान याच्याबरोबर घरातून पळून गेली. धर्मजागरण, रक्षावाहिनी संघटनेचे कार्यकर्ते आणि युवतीचे कुटुंबीय यांनी तिला शोधून काढून घरी परत आणले; मात्र २ जूनला ती युवती पुन्हा घरातून पळून गेली. मधल्या काळात युवतीचे धर्मपरिवर्तन करून तिच्याशी खान याने विवाह केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सदर युवतीला कह्यात घेतले. त्या वेळी पोलिसांनी धर्मांध महिलांसह युवतीला रात्री ‘सखी सेंटर’ मध्ये ठेवले; पण मुलीच्या कुटुंबियांना तिला भेटू दिले नाही. नियमानुसार धर्मांध महिलांनाही बाहेर ठेवायला हवे होते; पण त्यांना जाणीवपूर्वक मुलीसह ठेवले, असा गंभीर आरोप हिंदुत्वनिष्ठांनी केला आहे. (पोलिसांनीच गुन्हेगाराची अप्रत्यक्ष बाजू घेणे म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार होय ! असे पोलीस जनतेला कायद्याचे राज्य काय देणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *