अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी अधिवक्त्यांना निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन आणि पोलीस यांना ते दिसत नाही का ? आणि असे अतिक्रमण ते होऊ कसे देतात ? उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे राज्य असतांना अशी परिस्थिती कशी निर्माण होते ?
प्रयाग : येथील चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये मुसलमानांनी केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे एक निवेदन अधिवक्त्यांच्या शिष्टमंडळाने येथील जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षक आणि विभागीय अधिकारी यांना दिले आहे. चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये मुसलमानांकडून नमाजपठणाच्या नावाखाली अराजकता, अतिक्रमण, अस्वच्छता आणि ध्वनीप्रदूषण केले जात आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये धर्माच्या नावाखाली चाललेल्या अवैध कृती तातडीने रोखण्यात याव्यात, अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
अधिवक्ता अवधेश राय यांच्या नेतृत्वाखाली अधिवक्त्यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. अधिवक्त्यांच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री अवधेश राय, नरेंद्र प्रताप सिंह, पवन शुक्ला, बृजेश तिवारी, सुनील श्रीवास्तव, विकास शर्मा, मुन्ना यादव, कुलदीप सिंह आणि सत्यवान यादव या अधिवक्त्यांचा समावेश होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात