Menu Close

‘बकरी ईदच्या दिवशी गायींची कत्तल करतांना विरोध झाल्यास अन्य कोणाची ‘कुर्बानी’ द्यावी लागू नये !’

कर्नाटकातील मौलाना तन्वीर हाश्मी यांची काँग्रेसच्या आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उघड धमकी

  • अकबरुद्दीन ओवैसी १५ मिनिटांत हिंदूंना ठार करण्याची भाषा करतो, तर हाश्मी कत्तल करण्याची; ही सहिष्णुता आहे, असे देशातील तथाकथित पुरोगाम्यांना वाटते म्हणून ते पुरस्कार परत करत नाहीत !
  • कर्नाटकमध्ये जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेस यांचे युती सरकार असल्याने हाश्मी यांच्यावर काहीच कारवाई होणार नाही, हेही तितेकच खरे !

विजयपुरा (कर्नाटक) : मी एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून देतो की, २ मासांनी ईद आहे. गायींच्या नावाखाली आता सैतान गोंधळ घालेल. आताच सांगून ठेवत आहे की, असे होऊ नये की, गायीसह आणखी एकाची कुर्बानी द्यावी लागेल, अशी चिथावणीखोर धमकी येथील हाशीम पीर दर्ग्याचे मौलाना तन्वीर हाश्मी यांनी दिली आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. या वेळी आरोग्यमंत्री आणि काँग्रेस आमदार शिवानंद पाटील हेही उपस्थित होते; मात्र यावर पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (यावर राहुल गांधी काही बोलतील कि गप्प रहातील ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या कार्यक्रमातील तन्वीर हाश्मी यांच्या भाषणाची एक चित्रफीत सामाजिक माध्यमातून सर्वत्र प्रसारित झाली आहे. यात ते वरील चिथावणीखोर विधान करतांना दिसत आहेत.

कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्त्या रितू राठोड यांनी कर्नाटक सरकारवर टीका केली आहे. ‘सरकारचे या प्रक्षोभक विधानावर मौन का पाळत आहे ? मौलाना गोवंश हत्येसाठी लोकांना पाठिंबा देत आहेत, ही लाजिरवाणी गोष्ट असून राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे’, असे राठोड यांनी म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *