राज्यभर गोवंश चोरीला जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत; परंतु भाजप शासनाला याविषयी अजिबात गांभीर्य नाही ! गोवंश हत्याबंदीच्या कायद्याची कार्यवाही राज्यभर कडक झाली असती, तर एव्हाना गोवंशाच्या चोर्या थांबल्या असत्या ! गोवंश पालन करणार्या संतांचे तळतळाट काँग्रेसला कसे भोगावे लागले, हे शासनाला वारंवार सांगायला हवे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
दारव्हा (जिल्हा यवतमाळ) : स्थानिक गोपालनगर येथील सनातन प्रभातचे वाचक श्री. निखिल जीवन गिरी यांच्या घराचे कुलूप तोडून १५ जूनच्या मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गाय चोरण्यात आली. (ज्यांचे पोट गोवंशावर अवलंबून आहे, तोच चोरीला गेला, तर अशा सामान्यांनी किंवा शेतकर्यांनी काय करावे ? अशांना सरकारी साहाय्य का मिळत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) १६ जूनला ईद असल्याने ही गोमाता ईदच्या निमित्ताने गोहत्या करण्यासाठी नेली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात दारव्हा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी येथील श्री गजानन महाराज मंदिराचे पुजारी यांचीही गाय चोरीला गेली आहे. (या चोरीच्या संदर्भात पोलिसांनी तत्परतेने अन्वेषण करून चोरांना कडक शिक्षा केली असती, तर कदाचित पुन्हा चोरी झाली नसती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलीस प्रशासनाकडून रात्रीची गस्त नसल्यामुळे चोरांचे धैर्य वाढले आहे, अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात