- ख्रिस्तीबहुल मिझोराममध्ये योगदिन साजरा न होणे आश्चर्याची गोष्ट नाही !
- सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूच म्हणतात आणि त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करतात, मुसलमान आणि ख्रिस्ती मात्र त्यांच्या धर्मानुसार वागतात अन् हिंदु धर्माच्या प्रत्येक कृतींचा विरोध करतात किंवा त्यावर बहिष्कार घालतात ! याविषयी देशातील एकही पुरोगामी, निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत !
नवी देहली : देशासह जगभरात २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला असतांना ख्रिस्तीबहुल मिझोराम राज्यात काँग्रेस सरकारकडून योगदिन साजरा करण्यात आला नाही, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
१. हिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, राज्याचे मुख्यमंत्री लाल थनहवला आणि त्यांचे मंत्री यांनी योगदिन साजरा करणार नसल्याचे म्हटले आहे.
२. राज्याचे क्रीडामंत्री जोडिंगतलुआंगा म्हणाले, मला योगदिनाविषयी काही माहिती नाही. मी सध्या माझ्या परिसरात आलेल्या पुरामुळे त्रस्त झालो आहे आणि अडचणीत सापडलेल्या जनतेला साहाय्य करण्यामध्ये व्यस्त आहे.
३. भाजप प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जेवी हलुना यांनी याविषयी सांगितले की, केंद्र जे काही करील, त्याच्या उलट कृती करावी, असेच येथील मुख्यमंत्र्यांना वाटते; म्हणून येथे योगदिन साजरा करत नाहीत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात