चेन्नई : अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने पेरंबूर येथे १७ जून या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये धर्माभिमानी आणि विविध संघटनांचे नेते सहभागी झाले होते. या सत्संगामध्ये श्री महासरस्वती श्री किरियाधास स्वामी यांनी मार्गदर्शन केले. स्वामीजींनी दैनंदिन जीवनात साधना आणि निष्काम प्रार्थना यांचे महत्त्व विशद केले. त्यानंतर अखिल भारत हिंदु महासभेचे श्री. बालसुब्रह्मण्यम् यांनी उपस्थितांना संबोधित केले. हिंदु धर्म, धर्माची सद्यस्थिती, ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या हिंदु धर्माच्या विरोधातील कारवाया अन् हिंदु धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंनी करावयाचे प्रयत्न यांविषयी श्री. बालसुब्रह्मण्यम् यांनी मार्गदर्शन केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. बालाजी आणि श्री. जयकुमार हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साजर्या करण्यात येणार्या गुरुपौर्णिमा महोत्सवाची माहिती दिली. या वेळी सनातनच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या सत्संगात १०० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात