चेन्नई : येथील कोलाथूरमधील श्री गणेश मंदिरात नुकताच कुंभाभिषेक कार्यकम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. जयकुमार आणि सौ. सुगंधी जयकुमार उपस्थित होत्या. सौ. सुगंधी जयकुमार यांनी मंदिराच्या दर्शनाचे महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले. या कार्यक्रमात १०० हून अधिक भाविक उपस्थित होते. या वेळी मंदिरातील पुजार्याकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
चेन्नई : श्री गणेश मंदिरात कुंभाभिषेक कार्यकमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान
Tags : Hindu Janajagruti Samiti