योग हिंदु धर्माची देणगी आहे आणि त्याद्वारे ईश्वराशी एकरूप होता येते; मात्र आज त्याचे स्वरूप ‘एक व्यायाम प्रकार’ असे करण्यात आले आहे. याला केंद्रातील भाजप सरकार उत्तरदायी आहे, हे राजनाथ सिंह यांच्या या विधानातून पुन्हा स्पष्ट होते !
नवी देहली : योग कुठल्याही एका विशिष्ट धर्माशी जोडला जाऊ नये. भारताने आंतरराष्ट्रीय योगदिनासाठी संयुक्त राष्ट्रामध्ये जेव्हा ठराव मांडला, तेव्हा अनेक मुसलमान राष्ट्रांनीही त्या ठरावाला पाठिंबा दर्शवला होता, असे ‘ट्वीट’ केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. या ‘ट्वीट’वर लेखक बी.आर्. हरन यांनी प्रत्युत्तर देत ‘ट्वीट’ केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राजनाथ सिंहजी पतंजलिऋषि कोण आहेत ? ते कुठल्या धर्माचे आहेत ? चर्चने वेद, उपनिषदे आणि मंदिरातील पूजाविधी इत्यादी योग्य ठरवतांना ते कुरुप करून टाकले आहेत. वेद कुठल्या एका विशिष्ट धर्माशी जोडले जाऊ नये, असे आपण म्हणू शकता का?’
कुठल्याही जाती आणि धर्म यांचे लोक योग आचरणात आणू शकतात ! – केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन्
योगाकडे धार्मिक आचरणाचा भाग म्हणून पाहिले जाऊ नये. काही जण योग धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. योग सर्व जण आचरणात आणू शकतात, मग ते कुठल्याही जाती-धर्माचे असो. निधर्मी आणि मोकळ्या मनाने योग केला पाहिजे, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी योगदिनाच्या कार्यक्रमात म्हटले. (साम्यवादी विजयन् आणखी काय म्हणणार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments