Menu Close

बेंगळूरूमध्ये भाजप कार्यकर्त्याची अज्ञातांकडून हत्या

कर्नाटकमधील काँग्रेस आणि जनता दल (ध) या पक्षांच्या राज्यातील विरोधी पक्षातील, तसेच हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या होणार्‍या हत्यांवर कोणीच बोलत नाही; मात्र तथाकथित निधर्मीवादी आणि पुरोगामी यांच्या हत्या झाल्यावर देशात रान उठवले जाते आणि पोलिसांवर दबाव आणून हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यास भाग पाडले जाते !

बेंगळूरू : येथे महंमद अन्वर या भाजप कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. अन्वर बेंगळूरूच्या चिक्कमंगळूरचे भाजप सरचिटणीस होते. गोवरी कलुवे भागात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची हत्या केली. पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *