- जगात ५२ देशांत मुसलमान सत्तेत आहेत; मात्र ही सर्व राष्ट्रे ‘धर्मनिरपेक्ष’ नसून ‘इस्लामी’ आहेत, हे ओवैसी का सांगत नाहीत ?
- भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली, तेव्हापासून पाकमध्ये मुसलमानच बहुसंख्य आहेत आणि ते मुसलमानांनाच मत देतात, तरी तो देश ‘धर्मनिरपेक्ष’ नाही, हे ओवैसी का सांगत नाहीत ?
- भारतात बहुसंख्य हिंदु असल्यानेच येथे धर्मनिरपेक्षता जिवंत आहे आणि त्याच्या नावाखाली सर्व राजकीय पक्ष मुसलमानांचे लांगूलचालन करून हिंदूंवर अन्याय अन् अत्याचार करत आहेत, हे वास्तव आहे !
भाग्यनगर : भारतात धर्मनिरपेक्षता जिवंत ठेवायची असेल, तर तुम्हाला तुमच्या (मुसलमान) उमेदवारालाच मत द्यावे लागेल, असे आवाहन एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. ‘मुसलमान सत्तेत आले, तर धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही सशक्त बनेल’, असा दावाही त्यांनी केला. (भारतात मुसलमान सत्तेत आले, तर हा देश इस्लामी देश होईल, हे वेगळे सांगायला नको ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी ओवैसी यांनी ‘वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सिद्ध रहा’, असे आवाहनही केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात