किती हिंदु नेत्यांमध्ये असा धर्माभिमान आहे ? या विधानाविषयी धर्मनिरपेक्षतावादी, तसेच पुरो(अधो)गामी विचारवंत आणि पत्रकार आदींना काय म्हणायचे आहे ?
मुंबई : केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने शरीयतमध्ये पालट करण्याचा प्रयत्न चालवला आहे; मात्र हा त्यांचा प्रयत्न आम्ही कधीही खपवून घेणार नाही. यासाठी वाटेल ते करू; पण चंद्र, सूर्य, तारे असेपर्यंत शरीयतचा कायदा पालटू देणार नाही, अशी दर्पोक्ती एम्आयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली. नरेंद्र मोदींनी अगोदर त्यांच्या पत्नीला न्याय द्यावा आणि मगच आमच्या महिला-भगिनींना न्याय देण्याच्या गोष्टी कराव्यात, अशी खालच्या थराला जाऊन संदर्भहीन टीकाही त्यांनी केली. (मोदी यांनी त्यांच्या पत्नीवर अन्याय केला आहे, हे ओवैसी यांनी स्वतःच कसे ठरवले ? देशासाठी त्याग करण्याची हिंदूंची परंपरा धर्मांधांना कणभर तरी कळेल, याची आशा करायला नको ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) बीड येथील मोमीनपुरा येथील बिंदुसरा नदीजवळील मैदानात तहफुज-ए-शरियत या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी ओवैसी म्हणाले,
१. देशातील गरीब लोक एकवेळचे अन्न खाऊन जगत आहेत आणि सरकार मात्र ‘अच्छे दिन’ (चांगले दिवस) आल्याचा गवगवा करत आहे. सरकारने अगोदर गरिबांच्या एकवेळच्या अन्नाची व्यवस्था करावी आणि मगच योगाच्या गोष्टी कराव्यात. (योगाचे महत्त्व जाणून न घेता त्यावर अकारण टीका करणारे ओवैसी यांच्यामध्ये हिंदुद्वेष किती भिनला आहे, हेच लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. सहस्रो कोटी रुपयांचे बँकांचे कर्ज बुडवून या देशातील नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्यासारखी माणसे देश सोडून जातात; मात्र या प्रश्नाचे उत्तर देशाचे पंतप्रधान देत नाहीत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात