Menu Close

झारखंडमध्ये ख्रिस्ती नक्षलवाद्यांकडून ५ तरुणींवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणी पाद्रयाला अटक

कठुआ (जम्मू) येथील कथित बलात्काराच्या प्रकरणावरून हिंदूंना बलात्कारी म्हणणारे आता गप्प का आहेत ?

खुंटी (झारखंड) : नक्षलवादग्रस्त खुंटी जिल्ह्यात मानवी तस्करीच्या संदर्भात पथनाट्याद्वारे जागृती करण्यासाठी आलेल्या एका पथकातील ५ तरुणींचे अपहरण करून त्यांच्यावर ख्रिस्ती नक्षलवादी आणि गुंड यांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना १९ जून या दिवशी कोचांग गावामध्ये घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका पाद्रयासहित तीन जणांना अटक केली आहे. पाद्रयाच्या सांगण्यावरून या तरुणींवर बलात्कार करण्यात आले, असा आरोप पोलिसांनी केला आहे.

१. झारखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आर्.के. मलिक म्हणाले की, बलात्कार्‍यांनी यातील २ तरुणींच्या गुप्तांगामध्ये लाकूड आणि बंदूक घातली होती, तसेच त्यांनी या बलात्काराचे चित्रीकरण केले होते. या तरुणींना धडा शिकवण्यासाठी हे अत्याचार करण्यात आले. ‘पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया’चे नक्षलवादी आणि स्थानिक गुंड यांनी हे बलात्कार केले. त्यांच्या अटकेसाठी शोधमोहीम चालू आहे.

२. या प्रकरणी आर्.सी. मिशन विद्यालयाचे पाद्री फादर अल्फान्सो आइन्द यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बलात्कारासाठी प्रवृत्त करणे, त्यांना संरक्षण देणे आणि बलात्काराचे प्रकरण समोर येऊ नये, यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप ठेवला आहे. अटकेनंतर करण्यात आलेल्या चौकशीनंतर त्यांना जामिनावर सोडून देण्यात आले.

३. जेव्हा नक्षलवादी तरुणींना घेऊन जात होते, तेव्हा पाद्रयाने त्यांना विरोध केला नाही. उलट त्यांनी तरुणींना नक्षलवाद्यांसह जाण्यास सांगितले. ‘ते तुम्हाला काही करणार नाहीत आणि नंतर सोडून देतील’, असे सांगितले; मात्र त्याच वेळी त्यांनी मिशनच्या २ ननला नेण्यास विरोध केला. नक्षलवादी त्यांनाही नेत होते.

४. नक्षलवाद्यांनी या तरुणींना आणि त्यांच्यासह असलेल्या ३ पुरुषांना त्यांच्या गाडीत बसवून उडो जंगलात नेले. तेथे नक्षलवाद्यांसहित गुंड टोळीचा नेता जोनास टुडी आणि त्याचे साथीदार उपस्थित होते. जोनास याने या तरुणींच्या अपहरणाचा कट रचला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *