इंडोनेशियासारख्या भारतापेक्षा छोट्या आणि इस्लामी देश असणार्या देशात जिहादी आतंकवाद्यांना अवघ्या २ वर्षांत फाशीची शिक्षा ठोठावली जाते, तर निधर्मी भारत देशात गेली साडेतीन दशके जिहादी आतंकवादाने ग्रस्त असणार्या आतंकवाद्यांना पोसले जाते !
जकार्ता : इंडोनेशियाच्या स्टार बक्स कॅफेत वर्ष २०१६ मध्ये झालेल्या आत्मघाती आक्रमणाच्या प्रकरणी मौलाना अमान अब्दुर रहमान याला स्थानिक न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. मौलानावर या आक्रमणाचा कट रचल्याचा आरोप होता. या आक्रमणाचे दायित्व इस्लामिक स्टेटने घेतले होते. मौलाना अब्दुर रहमान इंडोनेशियातील इस्लामिक स्टेटचा प्रमुख होता. तो स्थानिक कट्टरतावादी संघटना जमाह अंशरूत दौलाह(जेएडी)चा धार्मिक नेताही होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात