Menu Close

दगडफेक करणार्‍या मुलांमागे पाकमधील आतंकवादी संघटना ! – संयुक्त राष्ट्रे

  • जे संयुक्त राष्ट्रांना कळते, ते भाजप सरकारला कळत नाही का ?
  • काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे हनन होते’, असे म्हणणार्‍या संयुक्त राष्ट्राला इतक्या वर्षांनंतर हे लक्षात आले का ?
  • ‘काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक करणारी लहान मुले आहेत. त्यांना आतंकवादी म्हणणार नाही. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येतील’, असे म्हणणारे भाजपचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आता काही बोलतील का आणि कारवाईचे आदेश देतील का ?

नवी देहली : जम्मू-काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक करण्यासाठी जैश-ए-महंमद आणि हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनांनी अल्पवयीन मुलांचा वापर केला, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. ‘अल्पवयीन मुले आणि हिंसाचार’ याच्याशी संबंधित वार्षिक अहवालामध्ये संयुक्त राष्ट्रांनी ही माहिती दिली आहे. ‘जगभरात अशा गोष्टींसाठी १० सहस्र मुलांना वापरण्यात आले’, असेही यात म्हटले आहे. या अहवालात मुलांचा वापर करणार्‍या एकूण २० देशांचा समावेश आहे. त्यामध्ये भारतासह सीरिया, अफगाणिस्तान, येमेन, फिलिपिन्स आणि नायजेरिया यांचाही समावेश आहे.

१. या अहवालात म्हटले आहे की, भारतीय सैन्य आणि आतंकवादी संघटना यांच्यातील हिंसक घटनांमध्ये मुलांचा बळी देण्यात येतो. काश्मीर, झारखंड आणि छत्तीसगड येथे असे प्रकार घडले आहेत. झारखंड आणि छत्तीसगड येथे नक्षलवादी अल्पवयीन मुलांना सशस्त्र हिंसाचारात सहभागी करून घेत आहेत.

२. भारत सरकारने यावर योग्य कारवाई करावी, गुन्हेगारांना शिक्षा करावी आणि लहान मुलांवरील अन्याय दूर करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांशी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

३. पाकिस्तानपुरस्कृत आतंकवादी संघटना आणि नक्षलवादी यांच्या कारवायांमुळे अनेक ठिकाणी शाळा बंद पडल्या आहेत. त्यामुळे मुलांची शैक्षणिक हानी होत आहे.

४. पाकिस्तानमध्येही मदरशांमधील मुलांना आत्मघातकी आक्रमणे करायला लावण्यात आले आहे. शाळांवर आणि विशेषत: मुलींच्या शिक्षणाला लक्ष्य करून करण्यात येणार्‍या आक्रमणांना पाकिस्तान सरकारने गांभीर्याने घ्यावे, असा सल्ला या अहवालात देण्यात आला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *