नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा मोहम्मद अली जिना यांनी जन्म घ्यायला नको. जर जेएनयूत पुन्हा जिना यांचा जन्म झाल्यास त्याला तेथेच गाडून टाकू, असे भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. कन्हैयाने कारागृहाबाहेर आल्यानंतर भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.
आदित्यनाथ म्हणाले की, जेएनयूसारखी संस्था देशद्रोह्यांचा अड्डा बनू देणार नाही. कन्हैयाला न्यायालयाने कोणत्या अटींवर जामीन दिला आहे, हे पाहिले पाहिजे. त्याला फक्त अंतरिम जामीन देण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अर्थ असा होत नाही की तुम्ही देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी व्हावे.
संदर्भ : सकाळ