Menu Close

पोलिसांनी निजामाच्या औलादीचा बंदोबस्त करावा आणि ते शक्य नसल्यास शिवसेनेला लेखी कळवावे !

शिवसेनेचे नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

  • शिवसेनाप्रमुखांच्या मुशीतून सिद्ध झालेले शिवसैनिकच अशी सडेतोड भूमिका घेऊ शकतात; म्हणूनच हिंदूंना शिवसेनेचा आधार वाटतो !
  • शेवटच्या श्‍वासापर्यंत धर्मांधांचा बंदोबस्त आणि हिंदूंचे संरक्षण करण्याचा निर्धार !

संभाजीनगर : जमावबंदी आदेश लागू असतांना एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यासमोर ५ ते ६ सहस्र लोकांचा जमाव जमवून दंगलसदृश परिस्थिती निर्माण केली. ‘पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करून निजामाच्या या औलादीचा बंदोबस्त करावा, पोलिसांना ते शक्य नसल्यास तसे शिवसेनेला लेखी कळवावे. या धर्मांधांचा बंदोबस्त आणि हिंदूंचे संरक्षण आम्ही शेवटच्या श्‍वासापर्यंत करू’, अशी चेतावणी शिवसेनेचे नेते तथा खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी २७ जून या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे दिली.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. एमआयएमने काही दिवसांपूर्वी संभाजीनगर शहरात दंगल घडवली. दंगलीतील काही जणांना पोलिसांनी न्यायालयाच्या अनुमतीने अटक केली. त्यांना अटक करण्यात येऊ नये; म्हणून आमदार इम्तियाज जलील यांनी जमावबंदी आदेश असतांना सिटी चौक पोलीस ठाण्यावर ५ ते ६ सहस्र धर्मांधांचा अघोषित मोर्चा नेला. तेथे त्यांनी धरणे आंदोलनही केले.

२. इम्तियाज जलील कालपर्यंत शहरात शांतता राखण्यासाठी मला पत्र लिहून ‘आपण शांतता मोर्चा काढू’, असे म्हणत होते; मात्र त्यांनीच सिटी चौक पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून दंगलसदृश परिस्थिती निर्माण केली. ही घटना घडत असतांना सिटी चौक बाजारपेठेतील हिंदूंची दुकाने बळजोरीने बंद केली जात होती. हिंदु व्यापारी दूरभाषवरून किंवा प्रत्यक्ष भेटून बाजारपेठेत दहशत माजवली जात असल्याच्या तक्रारी करत होते.

३. आम्ही पोलीस उपायुक्त ढाकणे यांना ‘दुकाने उघडण्यासाठी तात्काळ बंदोबस्त द्या. बाजारपेठेतील एमआयएमप्रणित धर्मांधांची दहशत थांबवा’, अशा सूचना दूरभाषवरून दिल्या; मात्र पोलिसांनी काहीही केले नाही.

४. हे धरणे चालू असतांना धर्मांध ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत होते. काही धर्मांध महिला पोलीस ठाण्यात बांगड्या फेकत होत्या.

५. इम्तियाज जलील हे ‘पोलीस फेरीवाल्यांकडून पैसे खातात, हप्ते घेतात’, असे बिनबुडाचे, बिनपुराव्याचे आरोप करत होते, तर पोलीस आयुक्तांसारखे अधिकारी मात्र याच पोलीस ठाण्यात मागच्या दाराने लपून-छपून आत जातात. हीच महाराष्ट्राच्या गृहखात्याची मर्दानगी आहे का ? ४ घंटे घोषणाबाजी करणार्‍या आणि दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणार्‍या आमदार इम्तियाज जलील यांच्यावर पोलीस गुन्हा प्रविष्ट करणार आहेत का ? पोलीस तथा महाराष्ट्राचे गृहखाते हे काम करू शकत नसेल, तर आम्हाला तसे लेखी द्या.

६. शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यावर हिंदूंचे रक्षण करण्याचे संस्कारच केले आहेत. आम्ही यापूर्वीही यासाठी रस्त्यावर उतरलो होतो. आम्हाला ते नवीन नाही; मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्यासाठी आपले गृहखातेच उत्तरदायी राहील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *