मांस आणि अंडी विक्री करणारी दुकाने शहराबाहेर स्थानांतरित करण्याची मागणी
भाजपच्या राज्यात वैध मार्गाने हिंदूंच्या संघटनांनी केलेल्या विरोधाला दाबण्याचा प्रकार संतापजनक आहे ! याचे परिणाम भाजपला आगामी निवडणुकीत भोगावे लागल्यास आश्चर्य वाटू नये !
मंदसौर (मध्यप्रदेश) : येथील श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष सरदार कुणाल श्रीवास्तव यांनी नगरातील समाजप्रमुखांसह अवैधरित्या मांस आणि अंडी विक्रीच्या दुकानांना गावाबाहेर स्थानांतरित करण्याच्या मागणीसाठी मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत २४ जूनला समाजातील विविध प्रतिनिधींनी एकत्रित येऊन गांधीवादी पद्धतीने वरील मागणीसाठी आवाहन केले होते; परंतु पोलीस प्रशासनाने सेनेचे अध्यक्ष सरदार कुणाल श्रीवास्तव, राजेश माळी आणि अर्पिता जैन यांना अटक केली आहे. पोलिसांच्या या कृत्याचा श्रीराम युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी विरोध केला आहे.
श्रीराम युवा सेनेचे श्री. विनय श्रीवास्तव म्हणाले की, मंदसौर हे पवित्र नगर आहे आणि येथे अवैधरित्या मांस अन् अंडी विक्रीची दुकाने या पवित्रतेला डाग लावत आहेत. यासाठी वेळोवेळी जिल्हा आणि पोलीस प्रशासन, तसेच नगरपालिका यांना आवेदन दिले; पण त्यावर कोणतीही कार्यवाही प्रशासनाकडून केली गेली नाही. सरदार कुणाल श्रीवास्तव यांना अटक करणे म्हणजे गांधीवादी पद्धतीने करत असलेल्या मोहिमेला प्रशासनाने दाबण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीराम युवा सेनेवर प्रशासनाने कार्यवाही केली असली, तरी आम्ही आमच्या मागणीसाठी नगरातील नागरिकांसोबत अवैधरित्या मांस आणि अंडी विक्री दुकानांना गावाबाहेर स्थानांतरित करण्याची मोहीम करत राहू.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात