शंकरापुरम् (तमिळनाडू) : तमिळनाडू राज्यातील कल्लाकुरुची शहरात असलेल्या शंकरापुरम् येथे वासवी क्लबच्या ‘डॉन टू डस्क’ कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान घेण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. कल्पना बालाजी आणि सौ. सुगंधी जयकुमार या कार्यक्रमास उपस्थित होत्या. सौ. बालाजी यांनी ‘जीवनात असलेले साधनेचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान घेतले. सौ. सुगंधी जयकुमार यांनी ‘जीवनात गुरुंचे महत्त्व आणि गुरुपौर्णिमा’ यांविषयी मार्गदर्शन केले. ‘वैशाली कटाक्षम’चे संपादक श्री. मुथुगोपाल यांनी आरोग्याविषयक सूत्रे सांगितली. सौ. कल्पना बालाजी यांचे वाहनचालक श्री. बादशाह यांनी ग्रंथप्रदर्शनाची सेवा केली.
क्षणचित्रे
१. सनातन प्रभातच्या वर्गणीदार सौ. अनुराधा यांनी हे व्याख्यान आयोजित केले होते.
२. कार्यक्रमाला उपस्थित जिज्ञासू यांनी विषयात घेतलेल्या रुचीमुळे विषय चर्चात्मक झाला.
३. मुथुगोपाल यांनी त्यांच्या नियतकालिकामध्ये हिंदु जनजागृती समितीचे लेख प्रसिद्ध करण्याची सिद्धता दर्शवली.
४. सौ. अनुराधा यांनी वासवी क्लबच्या मासिक बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या साहाय्याने १० मिनिटे विषय मांडणार असल्याचे सांगितले.
५. वासवी क्लबच्या सदस्यांनी हिंदु जनजागृती समितीकडून चालू असलेल्या धर्मकार्याचे कौतुक करत २ सहस्र रुपये अर्पण दिले.