Menu Close

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे मशिदीसमोर लक्ष्मणाची मूर्ती उभारण्याच्या प्रस्तावाला धर्मांधांचा विरोध

  • आधी राममंदिराला विरोध आणि आता लक्ष्मणाच्या मूर्तीला विरोध !
  • ‘अशा विरोधकांनी भारतातून चालते व्हावे’, असे सांगण्याची वेळ आता आली आहे !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशची राजधानी लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील टिलेवाली मशिदीसमोरील लाल पुलाजवळ नगरपालिकेच्या जागेवर लक्ष्मणाची एक भव्य मूर्ती उभारण्याच्या प्रस्तावाला लक्ष्मणपुरी नगरपालिकेने मान्यता दिली आहे. ही मूर्ती उभारण्याला मुसलमान धर्मगुरूंकडून विरोध चालू झाला आहे.

१. टिलेवाली मशिदीचे मौलाना इमाम शाह फजर्लुरहमान यांनी म्हटले की, ईद आणि अन्य इस्लामी सणांच्या वेळी लाखो मुसलमान मशिदीबाहेर नमाजपठण करतात. जर मशिदीबाहेर लक्ष्मणाची मूर्ती बसवण्यात आली, तर मुसलमान त्या वेळी नमाजपठण करू शकत नाहीत. वर्ष १९९३-९४ मध्येही असाचा प्रस्ताव आला होता; मात्र त्या वेळी विरोधी पक्षांनी विरोध केल्यामुळे तो फेटाळला गेला. आताही आम्ही वरिष्ठ अधिकार्‍यांकडे याविषयी तक्रार करणार आहोत. पालिकेने हा निर्णय पालटावा; कारण मूर्ती बसवल्याने येथील शांततेला धोका निर्माण होऊ शकतो. (ही मौलाना यांची धमकीच होय ! अशा धमक्यांना नगरपालिकेने भीक घालू नये ! मूर्ती उभारल्याने शांततेला कोण धोका निर्माण करणार आहे, हे मौलाना यांनी सांगायला हवे. तसेच पोलिसांनी अशा लोकांवर आधीच कारवाई करायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. लक्ष्मणपुरीच्या महापौर संयुक्ता भाटिया म्हणाल्या की, मूर्ती बनवण्याचा प्रस्ताव पालिकेने संमत केला असला, तरी ती मूर्ती अद्याप कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार, ते स्पष्ट झालेले नाही. याविषयी वाद होऊ नये, याची आम्ही काळजी घेऊ.

३. नगरपालिकेतील भाजपचे उपनेते रामकृष्ण यादव आणि रजनीश गुप्ता यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. यात त्यांनी म्हटले होते की, लखनौचा इतिहास भगवान लक्ष्मण यांच्याशी जोडलेला आहे. यामुळे जनतेच्या भावना लक्षात घेऊन टिलेवाली मशिदीसमोर लक्ष्मणाची मूर्ती पालिकेने उभारावी.

४. भाजपचे प्रवक्ते शलभ मणी त्रिपाठी म्हणाले की, नगरपालिकेच्या भूमीवर नगरपालिका काहीही करू शकते. याला कोणी विरोध केला, तरी त्याला काही अर्थ रहात नाही. जर हा प्रस्ताव संमत झाला आहे, तर मूर्ती उभारली जाईल. नियमानुसार पालिका कृती करत असतांना त्याला कोणी विरोध करणार असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

५. भाजपचे नेते लालजी टंडन यांनी त्यांचे पुस्तक ‘अनकहा लखनौ’मध्ये लिहिले आहे की, ‘टिलेवाली मशिदीच्या येथे पूर्वी ‘लक्ष्मण टिला’ होता.’ त्यांचे पुस्तक प्रकाशित झाल्यावर या विधानाला विरोध करण्यात आला होता. (देशातील बहुतेक जुन्या मशिदी, मकबरा किंवा दर्गा हिंदूंची मंदिरे आणि प्राचीन इमारती यांवर अतिक्रमण करून बनवण्यात आले आहेत, हा इतिहास आहे. हिंदु राष्ट्रात हिंदूंच्या इमारती पुन्हा हिंदूंना देण्यात येतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

लखनौचे नाव पालटून ‘लक्ष्मणपुरी’ ठेवा ! – भाजपचे माजी केंद्रीयमंत्री कलराज मिश्रा

  • शहरांची मूळ नावे ठेवण्यासाठीची मागणी का करावी लागते ?
  • हिंदु राष्ट्रात त्या त्या शहरांची मूळ नावे देण्यात येतील !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : लखनौचे नाव पालटून भगवान श्रीरामाचे भाऊ लक्ष्मण याच्या नावावर ‘लक्ष्मणपुरी’ म्हणून ठेवले जावे, अशी मागणी भाजपचे माजी केंद्रीयमंत्री कलराज मिश्रा यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मिश्रा म्हणाले की, लखनौची ओळख लक्ष्मणामुळे आहे. आपल्याला आपली संस्कृती आणि वारसा वाचवायला हवा. सर्वांची सहमती असेल, तर लखनौचे नाव पालटले पाहिजे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *