नास्तिक, पुरोगामी, निधर्मीवादी आणि बुद्धीप्रामाण्यावादी हिंदूंना चपराक !
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील डॉ. माही तलत सिद्दीकी या मुसलमान महिलेने उर्दू भाषेत रामायण लिहिले आहे. मुसलमानांनाही रामायणातील चांगल्या गोष्टींची माहिती व्हावी, या उद्देशाने रामायण लिहिल्याचे त्यांनी सांगितले. (मुसलमानांना रामायणातील चांगल्या गोष्टी ठाऊक झाल्यावर ते राममंदिराला विरोध करणार नाहीत, अशी अपेक्षा हिंदूंनी करावी का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. डॉ. माही तलत सिद्दीकी यांना २ वर्षांपूर्वी कानपूरमधील बद्री नारायण तिवारी यांनी रामायणाची आवृत्ती भेट म्हणून दिली. ते वाचल्यानंतर ‘हे महाकाव्य उर्दू भाषेत लिहावे’, असा त्यांनी निर्धार केला.
२. ‘रामायणातून शांती आणि बंधुत्व यांचा संदेश देण्यात आला आहे. ते उर्दूत लिहिल्यानंतर मी तणावमुक्ती आणि शांतता अनुभवत आहे’, असे डॉ. माही यांनी सांगितले. (एका मुसलमान महिलेला रामायण वाचल्यावर असा अनुभव येतो; मात्र किती पुरोगामी आणि निधर्मी हिंदू हे रामायण वाचतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. डॉ. माही यांना रामायण उर्दू भाषेत लिहिण्यासाठी दीड वर्षाहून अधिक कालावधी लागला. हिंदी भाषेतील रामायणातील भावार्थ पालटू नये, याकडे विशेष लक्ष द्यावे लागले.
४. समाजात काही लोक धार्मिक सूत्रांवर चिथावणी देऊन हिंसा पसरवण्याचे काम करतात; पण कोणताही धर्मद्वेषाची शिकवण देत नाही, असा संदेशही डॉ. माही यांनी दिला. (डॉ. माही यांना असे वाटत असले, तरी जिहादी आतंकवादी मात्र त्यांच्या धर्माच्या शिकवणीनुसार आतंकवाद करतात, तसेच हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकींवर जिहादी मशिदींतून दगडफेक करतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यापुढे लेखणीतून सामाजिक ऐक्य घडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात