सोलापूर : येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने १ जुलै या दिवशी दैनिक सनातन प्रभातचे वाचक, हितचिंतक, अर्पणदाते यांच्यासाठी ‘साधनावृद्धी शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक जिवाला साधना कशी करावी, हे ज्ञात व्हावे, तसेच साधनेचे जीवनातील महत्त्व समजावे अन् प्रत्येकाने आनंदी जीवन जगावे, यासाठी या शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. वाचकांनी साधनेला आज दिशा मिळाली, योग्य साधना कशी करावी ते समजले, असे मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
या वेळी समितीचे श्री. राजन बुणगे यांनी ‘साधना आणि प्रार्थना यांचे महत्त्व’, श्री. दत्तात्रय पिसे यांनी ‘नामजपाच्या परिणामकारक पद्धती आणि त्याचे लाभ’, श्री. हिरालाल तिवारी आणि सौ. अनिता बुणगे यांनी ‘आध्यात्मिक उपाय कसे करावेत’, तर सौ. राजश्री तिवारी यांनी ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व’ हा विषय मांडला. शिबीर साडेचार घंटे होऊनही वाचक उठण्यास सिद्ध नव्हते.
वाचक आणि हितचिंतक यांचे अभिप्राय
१. येथे केवळ ३ मिनिटे नामजप करतांनाच पुष्कळ अनुभूती आल्या. घरी नामजप करतांना अशी शांतता अनुभवता येत नाही, ‘नामजप थांबूच नये’, असे वाटत होते.
२. घरामध्ये दूरचित्रवाणी पाहिल्याने डोके जड होते; पण येथे उत्साही आणि चांगले वाटलेे.
३. स्वभावदोष कसे घालवायचे, ते आज समजले. आमच्यातील स्वभावदोष आणि अहंभाव घालवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
४. असे मार्गदर्शन आम्हाला सतत मिळावे.
५. ‘माझ्या साधनेला आज दिशा मिळाली, योग्य साधना कशी करावी, ते समजले’, असे ३ वाचकांनी सांगितले.
६. ‘मला साधना समजण्यास विलंब झाला’, अशी खंत एका वाचकाने व्यक्त केली.
वर्ष २०१२ पासून मी सनातन संस्थेशी परिचित आहे. मी दैनिक सनातन प्रभात नियमित वाचते. साधकांनी मला साधना आणि सेवा यांचे महत्त्व सांगितले होते; पण कौटुंबिक अडचणींमुळे ती करता आली नाही, याचे मला दु:ख आहे. आता १५ दिवसांपासून मी सेवा करण्यास प्रारंभ केला आहे. शिबिरापासून त्यात नियमितता यावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना ! – सौ. मिश्रा
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात