Menu Close

चांगले पीक येण्यासाठी प्रतिदिन २० मिनिटे वेदमंत्र म्हणावेत : गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई

  • केंद्रातील भाजप सरकार देशातील जनतेला असे आवाहन का करत नाही ?
  • वेदमंत्रपठणाच्या योग्य उच्चारासाठी त्याचे शिक्षण घ्यावे लागते. शासनकर्त्यांनी जनतेला बालपणापासूनच साधना शिकवल्यास पीकही चांगले येईल !
  • वेदांना नावे ठेवणारे तथाकथित पुरो(अधो)गामी, अंधश्रद्धा निर्मूलनवाले, निधर्मी, नास्तिक आणि बुद्धीप्रामाण्यवादी आता याला विरोध करतील !

पणजी : पीक चांगले यावे, यासाठी गोव्यातील शेतकर्‍यांनी प्रतिदिन २० मिनिटे मंत्रोच्चार करावा, असे आवाहन गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते अन् गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी केले आहे. (भाजपच्या मंत्र्यांनी कधीही असे आवाहन केलेले नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) डॉ. अवधूत शिवानंद स्वामी यांनी ‘शिवयोग कृषी सेवा’ हा उपक्रम प्रारंभ केला आहे, त्याचे उद्घाटन करतांना सरदेसाई बोलत होते.

विजय सरदेसाई यांच्या धर्मपत्नी उषा या डॉ. अवधूत शिवानंद स्वामी यांच्या भक्त आहेत. सरदेसाई म्हणाले की, मलादेखील आधी हे खरे वाटले नव्हते; पण याविषयी स्वामींनी केलेले संशोधन वाचल्यानंतर माझ्या शंका दूर झाल्या. या उपक्रमासाठी पैशांची आवश्यकता नाही. शेतीकडे लोकांनी आकर्षित व्हावे, यासाठी मी अधिकाधिक प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मी सौंदर्यस्पर्धा किंवा ‘रॉक शो’चे आयोजन करण्यासही सिद्ध आहे. जानेवारी मासात विजय सरदेसाई यांच्या धर्मपत्नी उषा यांनी कृषी विभागाचे संचालक नेल्सन फिगेरिएडा यांच्यासह डॉ. शिवानंद स्वामी यांच्या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. यात त्यांनी शेतीचे महत्त्व सांगितले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *