Menu Close

फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाची हत्या

बंगाल, कर्नाटक आणि केरळ येथे भाजपची सत्ता नाही, तेथे संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत; मात्र उत्तरप्रदेशात भाजपची सत्ता असतांनाही संघाच्या स्वयंसेवकांची हत्या होणे भाजपला लज्जास्पद !

फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे येथील ३२ वर्षीय स्वयंसेवक संदीप शर्मा यांची त्यांच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. शर्मा संघाचे जिल्हा पर्यावरण प्रमुख होते. ‘संदीप यांच्या मारेकर्‍यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह कह्यात घेणार नाही’, असे संघाच्या स्वयंसेवकांनी घोषित केले आहे. संदीप शर्मा यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता. ३ जुलैला रात्री जेवण झाल्यानंतर ते घराबाहेर बसलेले असतांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला आणि ते पसार झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *