केवळ चित्र हटवणे पुरेसे नाही, तर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हिंदूंची क्षमा मागून पुन्हा असा अवमान करणार नाही, हे सांगायला हवे !
नवी देहली : ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ३ जुलैच्या दैनिकात नीरजा चौधरी यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे व्यंगचित्र काढून त्यांना पुरोहित दाखवण्यात आले होते. त्यांच्या शेंडीच्या ठिकाणी सरडा दाखवण्यात आला होता. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या. याचा हिंदूंनी विरोध केल्यानंतर दुसर्या दिवशी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने त्यांच्या संकेतस्थळावरून हे चित्र काढले आहे. हिंदु जनजागृती समितीने हिंदूंना वैध मार्गाने विरोध करण्याचे आवाहन केले होते.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या चित्रातून हिंदु धर्माचा अवमान
जुलै ५, २०१८
हिंदूंनी अशा हिंदुद्वेषी वृत्तपत्रांवर बहिष्कार घालायला हवा !
नवी देहली : ‘टाइम्स ऑफ इंडिया’ दैनिकात ३ जुलै २०१८ या दिवशी नीरजा चौधरी या हिंदुद्वेषी महिला पत्रकाराचा ‘आर्ट ऑफ फ्लिप फ्लॉप’ शीर्षकांतर्गत लेख प्रसिद्ध झाला आहे. यातील एका व्यंगचित्रामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ब्राह्मण दाखवून त्यांच्या डोक्यावर शिखेऐवजी सरडा दाखवण्यात आला आहे. या चित्रामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्याने धर्माभिमानी हिंदु याचा पुढील संपर्कावर निषेध करत आहेत.