काँग्रेसप्रमाणे भाजप शासनाच्या काळातही होणारी मंदिरांची लूट, हा हिंदूंचा अपेक्षाभंग !
नागपूर : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिकादेवी देवस्थानच्या मालकीची २०० कोटी रुपये मूल्याची १८४ एकर भूमी अनधिकृतरित्या अन्य व्यक्तींकडे हस्तांतरीत केल्याच्या प्रकरणी तेथील तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे, तसेच या तिघांनी पदाचा दुरुपयोग केल्याच्या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०१८ मध्ये ‘एफ्.आय.आर्.’ नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ६ जुलै या दिवशी विधान परिषदेत एका तारांकित प्रश्नावर लेखी स्वरूपात दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. (देवस्थानाच्या संपत्तीचा स्वत:च्या अधिकारात गैरवापर करून भ्रष्टाचार करणार्यांवर सरकारने तात्काळ कठोरात कठोर कारवाई करणे सश्रद्ध हिंदूंना अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात