समाजसेवेच्या नावाखाली चाललेल्या या संघटित गुन्हेगारीची संपूर्ण चौकशी करून असे आणखी किती प्रकार येथे झाले आहेत, हे उघड केले पाहिजेत !
रांची (झारखंड) : मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या संस्थेकडून नवजात अर्भकांची विक्री केल्याच्या प्रकरणी संस्थेच्या दोन नन्सना येथील पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात फसवणूक झालेल्या एका जोडप्याने तक्रार केली होती. त्यानंतर झारखंड सरकारच्या बालकल्याण समितीने चौकशी चालू केल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली.
१. ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’च्या कर्मचार्यांनी उत्तरप्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील एका जोडप्याला मूल विकले होते; पण काही दिवसांनी ‘काही प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत’, असे सांगून या जोडप्याला १ जुलैला संस्थेने परत बोलावले होते. ते आल्यावर संस्थेने त्यांच्याकडील मूल कह्यात घेतले आणि परत दिले नाही. हे १४ दिवसांचे मूल या संस्थेकडून विकत घेतांना या दांपत्याने १ लाख २० सहस्र रुपये दिले होते. त्यामुळे या दांपत्याने त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार रांचीच्या बालकल्याण समितीकडे केली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले.
२. ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’कडून अविवाहित मातांसाठी आश्रयगृह चालवले जाते. या आश्रयगृहातील एका महिलेच्या पोटी जन्माला आलेले मूल विकल्याचा काही कर्मचार्यांवर आरोप आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात