हिंदूंनी जेवणाविषयी जो संघटितपणा दाखवून विरोध केला, तसाच संघटितपणा हिंदु धर्म, देवता यांच्यावर होणार्या आघातांच्या वेळीही दाखवावा !
नवी देहली : ‘अमीरात एअरलाइन्स’ने प्रवासात हिंदु पद्धतीचे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण देण्याचे बंद केल्याचे घोषित केले होते; मात्र त्याला हिंदूंनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. ‘आम्हाला आमच्या ग्राहकांकडून जो प्रतिसाद मिळाला, त्यानुसार आम्ही आमच्या हिंदु ग्राहकांसाठी ‘हिंदु मील’ चालू ठेवणार आहोत’, असे अमीरात एअरलाइन्सकडून सांगण्यात आले. (‘नाक दाबले की, तोंड उघडते’, हेच यातून स्पष्ट होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) अमीरात एअरलाइन्स हे दुबईमधील विमान आस्थापन आहे.
भारतात अमीरात एअरलाइन्सच्या विमान सेवेला प्राधान्य देणार्या प्रवाशांची संख्या लक्षात घेतली, तर हे भारतातील सर्वांत मोठे विदेशी विमान आस्थापन आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात