मालिकेवर बंदी घालण्याची मागणी
चेन्नई : खासगी दूरचित्रवाहिनीवरील तमिळ भाषेतील ‘बिग बॉस’ या मालिकेतून तमिळ संस्कृतीचा अवमान होत असल्याच्या कारणावरून याच मालिकेचे सूत्रधार अभिनेते कमल हसन यांच्या विरोधात हिंदु मक्कल कत्छी या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने विजया टीव्ही वाहिनीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. या वेळी संघटनेने मालिकेवर बंदी घालण्याची मागणी केली.
संघटनेचे राज्य समन्वयक श्री. सेंथिल म्हणाले की, चित्रपटांना परिनिरीक्षण मंडळ प्रमाणपत्र देते; मात्र दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित होणार्या मालिकांवर असे कोणतेही नियंत्रण नसते. त्यामुळे ते विकृती असणारे कार्यक्रम प्रक्षेपित करतात. (दूरचित्रवाहिनीवर संस्कृतीहीन कार्यक्रम न होण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने कायदा करायला हवा. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आम्ही अशा कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणारे कमल हसन यांना विरोध करू. या संघटनेकडून यापूर्वीही कमल हसन यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात