- पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी इस्लामी गोल टोपी घातली नाही; म्हणून छाती बडवणारे या गोष्टीवर का बोलत नाहीत ? याला ते निधर्मीवाद आणि सर्वधर्मसमभाव समजतात का ?
- मदरशांना अनुदान देणारे केंद्रातील भाजप सरकार याविषयी का बोलत नाही ? मुलींना शिक्षण देण्यासाठी योजना राबवणार्या सरकारने याचा विरोध केला पाहिजे !
थिरुवनंतपुरम् : केरळमधील एका मदरशात कपाळावर गंध लावून गेल्यामुळे पाचवीत शिकणार्या एका विद्यार्थिनीची हकालपट्टी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मदरशातील एका लघुपटात ही विद्यार्थिनी अभिनय करणार होती. त्यासाठी ती कपाळावर चंदनाचे गंध लावून गेली होती; मात्र यामुळे तेथील शिक्षकांनी संतप्त होऊन तिला हाकलवून दिले. यानंतर या मुलीचे वडील उम्मर मलियल यांनी ‘फेसबूक’वर याची माहिती दिली.
१. उम्मर मलियल यांनी म्हटले आहे की, माझी मुलगी अभ्यासात हुशार आहे. तिला नृत्य आणि अभिनय यांचीही आवड आहे. तिने आतापर्यंत मदरसा स्तरावर झालेल्या स्पर्धेत अनेक पारितोषिके जिंकली आहेत; मात्र इतके असूनही तिला मदरशातून काढण्यात आले. त्यासाठी तिने कपाळावर गंध लावले होते, हे कारण न पटण्यासारखे आहे. ती भाग्यशाली आहेे; कारण त्यांनी तिच्यावर दगड मारण्याची तिला शिक्षा दिली नाही.
२. या घटनेनंतर अनेकांनी मदरसा प्रशासनावर टीका केली, तर काही जणांनी मदरशाच्या निर्णयाचे समर्थन केले. ‘डोक्यावर गंध किंवा टिकली लावणे, हे शरीयत आणि इस्लामविरोधी आहे. अशा धार्मिक गोष्टींचे भान राखणे आवश्यक आहे’, असे काही जणांचे म्हणणे आहे. (सरकारी अनुदान घेऊन हज यात्रा करणे, हे शरीयत आणि इस्लामविरोधी असतांनाही मुसलमान आतापर्यंत हजला जात आहेत, त्याविषयी कोणी का बोलत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात