झारखंडमध्ये भाजपचे राज्य असतांना हिंदूंचे धर्मांतर करण्याचे ख्रिस्ती मिशनरींचे धाडस कसे होते ?
दुमका (झारखंड) : येथील आदिवासीबहुल फुलपहाडी गावामध्ये ५ जुलैला संध्याकाळी २५ ख्रिस्ती मिशनरी प्रसारासाठी गेले होते. ते धर्मांतराचा प्रयत्न करत असल्याने येथील गावकर्यांनी त्यांना रात्रभर कैद करून ठेवले होते. दुसर्या दिवशी पोलीस येथे पोहोचल्यावर त्यांना सोडण्यात आले. यात १४ महिला आणि ११ पुरुष होते.
१. फुलपहाडी गावाचे सरपंच रमेश मुर्मू यांनी सांगितले की, हे मिशनरी एका लहान बसमधून गावात आले होते. त्यांना वरून आदेश होता की, येथे जाऊन हिंदूंचे धर्मांतर करावे, असे त्यांनी आम्हाला कैद केल्यावर सांगितले.
२. अन्य गावकर्यांनी सांगितले की, रात्री त्यांनी ध्वनीक्षेपकावरून सांगितले की, गावात सैतानाचे स्थान आहे. तुम्ही त्यांची पूजा करणे सोडून देऊन ख्रिस्ती धर्म स्वीकारा. त्या बदल्यात तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातील. यामुळेच गावकर्यांनी त्यांना कैद करून ठेवले.
३. सरपंच रमेश मुर्मू यांच्यासहित १९ जणांनी या मिशनरींच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली; मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात